शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

तिस-या दिवशीही महसूल विभागात शुकशुकाट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 19:49 IST

विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महसूल कर्मचारी संघटनेने १० आॅक्टोबरपासून पुकारलेले काम बंद आंदोलन तिसºया दिवशी अर्थात १२ आॅक्टोबरलादेखील सुरूच होते.

ठळक मुद्देकर्मचा-यांचा संप सुरूच नागरिकांची गैरसोय

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महसूल कर्मचारी संघटनेने १० आॅक्टोबरपासून पुकारलेले काम बंद आंदोलन तिसºया दिवशी अर्थात १२ आॅक्टोबरलादेखील सुरूच होते. वाशिम जिल्ह्यातील सर्व महसूल कर्मचारी व पदोन्नत नायब तहसीलदार आंदोलनात सहभागी असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयासह तहसिल कार्यालयांवर शुकशुकाट दिसून येतो. पुरवठा विभागातील पुरवठा निरीक्षक पद सरळसेवेने भरल्यास महसुल विभागातील अव्वल कारकुन दर्जाचे कर्मचाºयावर अन्याय होणार असून अनेक अव्वल कारकुन संवर्गातील कर्मचारी यांना पदावनत व्हावे लागणार आहे. त्यामुळे पुरवठा विभागाचे परिपत्रकान्वये दिलेल्या पदभरतीच्या सुचनेला स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य महसुल कर्मचारी संघटनेने केली आहे. याशिवाय कनिष्ठ लिपिक पदनाम बदलून महसूल सहाय्यक करणे, सेवानिवृत्तीचे वय ५८ वरुन ६० करणे, जुनी पेंशन योजना लागू करणे, पुरवठा निरीक्षक हे पद सरळसेवेने न भरता पदोन्नतीने भरणे, सातवा वेतन आयोग लागू करणे, ५ दिवसाचा आठवडा करणे, अव्वल कारकून संवर्गाची वेतन त्रुटी दूर करणे, आकृतीबंधाबाबत सकारात्मक निर्णय घेणे, शिपाई संवर्गातून तलाठी संवर्गात पदोन्नती तात्काळ देणे आदी मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महसूल कर्मचाºयांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालय, तहसिल कार्यालयाचे महसूलविषयक कामकाज ठप्प झाले आहे. कामानिमित्त येणाºया नागरिकांना खाली हात परत जावे लागत आहे. हा संप १०० टक्के यशस्वी होत असल्याचा दावा महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विशाल डुकरे यांनी गुरूवारी केला.