शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

हजारांवर शेतकºयांचे तुरीचे चुकारे थकित 

By admin | Updated: June 21, 2017 17:17 IST

येथील शासकीय खरेदी केंद्रावर तुरीची विक्र ी करणाºया हजारांहून अधिक शेतकºयांचे चुकारे दोन महिन्यांपासून प्रलंबित आहेत.

खरीप हंगाम अडचणीत: मंगरुळपीर तालुक्यातील वास्तवमंगरुळपीर: येथील शासकीय खरेदी केंद्रावर तुरीची विक्र ी करणाऱ्या हजारांहून अधिक शेतकऱ्यांचे चुकारे दोन महिन्यांपासून प्रलंबित आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांचा खरीप हंगाम अडचणीत आला असून, प्रशासनाने याची तातडीने दखल घेण्याची मागणी होत आहे. ूमंगरुळपीर तालुक्यात शासकीय खरेदी केंद्रावर तूर विकणाऱ्या १ हजार २८० शेतकऱ्यांचे २१ एप्रिल २०१७ पासून ते १८ मे २०१७ पर्यंतचे चुकारे बाकी आहेत. यामध्ये केंद्र सरकारच्या खरेदीचे अर्थात नाफेडच्या ९९८ खातेदारांचे ७ कोटी ९५ लाख, तर महाराष्ट्र शासनाच्या खरेदीचे २७२ खातेदारांचे २ कोटी ३१ लाख असे १९ कोटी २६ लाख रुपयांचे चुकारे थकित आहेत. परीश्रमाने पिकविलेल्या तुरीचे चुकारे मिळाल्यानंतर खरीप हंगामाची तयारी करावी, काही देणीघेणी करावी, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा असताना शासनाकडून या शेतकऱ्यांना दोन महिन्यापासून चुकारेच देण्यात आले नाही. त्यामुळे खरीप हंगामाची तयारी राहिली आहेच शिवाय घरगाडा चालविण्यासाठी या शेतकऱ्यांना कर्ज काढावे लागत आहे. या कर्जाच्या व्याजाचा बोजा वाढत असल्यामुळे हमीदराने तूर विकण्याचा काहीच फायदा या शेतकऱ्यांना झालेला नाही. शासकीय खरेदी केंद्रावर भाड्याने वाहन घेऊन तूर विक्र ीसाठी आणली. तेथे मोजणीसाठी नंबर न लागल्याने महिनाभर प्रतिक्षा करावी लागली. त्यासाठी इतर कामे सोडून आणि खाण्यापिण्याचा खर्च करून रात्री जागून काढल्या आणि तूर मोजणी झाल्यावर दोन महिन्यांपासून चुकारेच मिळाले नसल्याने सदर शेतकरी रडकुंडीस आले आहेत. येत्या दोन दिवसांत चुकारे मिळाले नाही, तर आंदोलन पुकारण्याचा इशारा चुकारे थकित असलेल्या शेतकऱ्यांनी दिला आहे.