शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

तिस-या दिवशी पाच धार्मिक स्थळं हटविले

By admin | Updated: June 27, 2016 02:24 IST

वाशिम शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळे हटाव मोहिमेत १२ अनधिकृत स्थळे हटवलीत.

वाशिम: शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळे हटाव मोहिमेंतर्गत तिसर्‍या दिवशी रविवारी पाच धार्मिक स्थळं हटविण्यात आली. गत तीन दिवसांत एकूण १२ अनधिकृत धार्मिक स्थळं हटविली आहेत. २९ सप्टेंबर २00९ नंतर उभारण्यात आलेली अनधिकृत धार्मिक स्थळे निष्कासित करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला होता. त्यानुसार वाशिम पालिकेने शहरातील धार्मिक स्थळांची पाहणी केली होती. या सर्व प्रक्रिया पार पाडल्यानंतर नगर परिषद प्रशासनाने शुक्रवारला अनधिकृत धार्मिक स्थळे निष्कासित करण्याच्या मोहिमेला प्रारंभ केला. या मोहिमेंतर्गत जिल्हा प्रशासन व नगर परिषद प्रशासनाने पहिल्या दिवशी चार, दुसर्‍या दिवशी तीन आणि तिसर्‍या दिवशी अर्थात रविवारी पाच अशा एकूण १२ अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई केली. रविवारी शिवाजी चौकातील दोन, काळे फैल भागातील एक, चंडिका वेस भागातील एक व शुक्रवारपेठ भागातील एक, असे एकूण पाच अनधिकृत धार्मिक स्थळं पोलीस बंदोबस्तात हटविली. वाशिम शहरात एकूण १८ अनधिकृत धार्मिक स्थळं असल्याचे प्रशासनाने यापूर्वीच जाहीर केलेले आहे. आता उर्वरित सहा अनधिकृत धार्मिक स्थळं हटविण्यात येणार आहेत. आतापर्यंंत शहरात संपूर्ण मोहीम शांततेत पार पडली आहे. यापुढेदेखील नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करून अशीच शांतता ठेवावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.