शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी तिस-या दिवशी ९७ उमेदवारी अर्ज

By admin | Updated: July 16, 2015 01:28 IST

तीन दिवसांत एकूण १२८ नामांकन दाखल.

वाशिम : ऑगस्ट महिन्यात होऊ घातलेल्या वाशिम जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी तिसर्‍या दिवशी ९७ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. तीन दिवसांत एकूण १२८ नामांकन दाखल झाले आहेत. ऑगस्ट-सप्टेंबर २0१५ मध्ये मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने २३ जुनला जाहीर केलेला आहे. वाशिम जिल्ह्यात १६३ ग्रामपंचायतींसाठी ४ ऑगस्टला सकाळी ७.३0 ते सायंकाळी ५.३0 या कालावधीत मतदान होणार असून, ६ ऑगस्टला मतमोजणी होईल. मालेगाव तालुक्यातून एकाही उमेदवाराने तिसर्‍या दिवसापर्यंत एकही नामांकन दाखल केले नाही. तिसर्‍या दिवशी रिसोड तालुक्यात मोप तीन, कंकरवाडी दोन, देऊळगाव बंडा एक, करंजी सहा, करडा चार, शेलु खडसे एक, खडकी सदार एक असे एकूण १८ अर्ज दाखल करण्यात आले आहेत. मानोरा तालुक्यात १५ जुलै रोजी ३१ उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले. यामध्ये गादेगाव ३, धामणी १, अजनी ७, वाईगौळ ९, शेंदूरजना (अ) ३ व आमकिन्ही १ असे एकूण ३१ अर्ज दाखल झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी एम.एस. मुडा यांनी दिली. कारंजा तालुक्यात तिसर्‍या दिवशी एकही नामांकन अर्ज दाखल झाला नाही. मंगरुळपीर तालुक्यात ३४ अर्ज दाखल झाले. यामध्ये चांभई १, फाळेगाव २, नांदखेडा ३, पार्डीताड ५, ईचा १, शेलूबाजार २, भूर १, चोरद १, लावणा ८, खडी १, कवठळ ९ अशी अर्जांचा समावेश आहे. तिसर्‍या दिवशी वाशिम तालुक्यातून १४ नामांकन अर्ज दाखल झाले. यामध्ये कळंबा महाली तीन, टो व पंचाळा प्रत्येकी एक, अनसिंग नऊ अशा १४ अर्जांचा समावेश आहे. नामांकन अर्ज सादर करण्याच्या दुसर्‍या दिवसापर्यंत एकूण ३१ अर्ज दाखल झाले होते. तिसर्‍या दिवशी ९७ अर्ज आल्याने एकूण १२८ नामांकन दाखल झालेत.