शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांच्या ‘आधार’साठी पंचायत समिती स्तरावर मिळणार प्रत्येकी दोन मशिन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 17:56 IST

आधार नोंदणी न झालेल्या विद्यार्थ्यांसाठी राज्यात पंचायत समिती स्तरावर प्रत्येकी दोन मशिन दिल्या जाणार आहेत.

- संतोष वानखडेवाशिम : यंदा शाळांमधील विद्यार्थ्यांचे आधारकार्ड अपडेट करणे अत्यावश्यक असून, २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात ‘स्टुडंट पोर्टल’वर आधार विषयक नोंद केलेल्या विद्यार्थ्यांची संख्याच संच मान्यता करताना विचारात घेतली जाणार आहे. अद्याप आधार नोंदणी न झालेल्या विद्यार्थ्यांसाठी राज्यात पंचायत समिती स्तरावर प्रत्येकी दोन मशिन दिल्या जाणार आहेत.राज्यातील प्राथमिक ते माध्यमिक शाळांच्या संच मान्यतेची प्रक्रिया, ‘एनआयसी’मार्फत जिल्हास्तरावर शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत होत असते. या अनुषंगाने राज्याच्या शिक्षण विभागाने २०१९ -२० मध्ये ‘स्टुडंट पोर्टल’वर विद्यार्थी विषयक माहितीची नोंद करताना आधार क्रमांकाची नोंद करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. तथापि, गतवर्षी अनेक शाळांनी आधार क्रमांक अद्ययावत केले नसल्याचे शिक्षण विभागाच्या निदर्शनात आले. चालू शैक्षणिक सत्रात प्रत्येक विद्यार्थ्याचे आधारकार्ड अद्ययावत करणे आणि आधारकार्ड नसणाºया विद्यार्थ्यांसाठी आधारकार्डची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. सध्या कोरोना विषाणू संसर्गामुळे वर्ग बंद आहेत. त्यामुळे तुर्तास तरी आधार क्रमांक अद्ययावत करणे किंवा विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढण्याची कार्यवाही बंद आहे. २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात शाळांच्या संच मान्यतेसाठी विद्यार्थ्यांची आधारविषयक माहिती ग्राह्य धरली जाणार आहे. कोरोनाच्या परिस्थितीत आधार कार्ड काढण्यासाठी विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून राज्यातील प्रत्येक पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी स्तरावर दोन आधार मशिन पुरविण्यात येणार आहेत. कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन आधार नोंदणी करण्याच्या सूचना शालेय शिक्षण विभागाकडून शिक्षणाधिकाऱ्यांना मिळणार आहेत. विद्यार्थ्यांच्या आधार नोंदणीसाठी पंचायत समिती स्तरावर दोन आधार मशिन मिळणार आहेत. कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन आधार नोंदणीविषयक सूचना वरिष्ठ स्तरावरून मिळणार आहेत.- अंबादास मानकरशिक्षणाधिकारी (प्राथमिक) वाशिम

टॅग्स :Adhar Cardआधार कार्डwashimवाशिम