शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

पावसाची विश्रांती, जलसाठय़ातील वाढ नाही

By admin | Updated: July 22, 2016 01:03 IST

वाशिम जिल्ह्यातील १२५ प्रकल्पांत सरासरी २२ टक्के जलसाठा; शेतकरी चिंतातूर, पावसाची प्रतिक्षा.

वाशिम : गत आठ दिवसांपासून थांबलेल्या पावसामुळे जलसाठय़ातील वाढ खुंटली आहे. ४३ लघू प्रकल्पांमध्ये शून्य जलसाठा आहे. उर्वरित प्रकल्पातील जलसाठय़ांमध्ये किंचितही वाढ झाली नाही. १२५ प्रकल्पांत सरासरी २१.९२ टक्के जलसाठा आहे.वाशिम जिल्ह्यात एकूण १२५ प्रकल्प असून, यामध्ये तीन मध्यम व १२२ लघू प्रकल्प आहेत. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात संततधार पाऊस झाल्याने जलाशयांमधील जलसाठय़ात वाढ होईल, अशी अपेक्षा असताना, प्रत्यक्षात समाधानकारक वाढ नाही. आता तर आठ दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने जलाशयांमधील जलसाठय़ाची परिस्थिती चिंताजनक आहे. तीन मध्यम प्रकल्पांपैकी सोनल प्रकल्पात केवळ ३.२५ टक्के जलसाठा आहे, तर एकबुर्जी प्रकल्पात १७.६३ आणि अडाण प्रकल्पात २८.८६ टक्के जलसाठा आहे. १२२ लघू प्रकल्पांत सरासरी २१.६१ टक्के जलसाठा आहे.मानोरा तालुक्यातील २३ लघू प्रकल्पांत सरासरी ६0.१५ टक्के जलसाठा असून, तीन प्रकल्पांत शून्य जलसाठा आहे. कारंजा तालुक्यातील १४ लघू प्रकल्पांत १५.२४ टक्के जलसाठा असून, तीन प्रकल्प शून्यावर आहेत. रिसोड तालुक्यातील १७ लघू प्रकल्पांत सरासरी केवळ १.९0 टक्के जलसाठा १0 प्रकल्प शून्यावर आहेत. मालेगाव तालुक्यातील २२ लघू प्रकल्पांत सरासरी १४.0५ टक्के जलसाठा असून, १२ प्रकल्पात शून्य जलसाठा आहे. वाशिम तालुक्यातील ३१ लघू प्रकल्पांत सरासरी १९.१३ टक्के जलसाठा असून, १२ प्रकल्प शून्यावर आहेत. मंगरुळपीर तालुक्यातील १५ लघू प्रकल्पांत सरासरी २१.५५ टक्के जलसाठा असून, तीन प्रकल्प शून्यावर आहेत.दरम्यान, जिल्ह्यात १३५ टक्के पाऊस रिसोड तालुक्यात झाल्याची नोंद आहे. तथापि, रिसोड तालुक्यातील जलाशयांच्या पातळीत केवळ सरासरी १.९0 टक्के जलसाठा आहे. सर्वाधिक जलसाठा मानोरा तालुक्यातील प्रकल्पांमध्ये सरासरी ६0 टक्के आहे.