शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

‘अंगणवाडी अ‍ॅप’मध्ये मराठीच नाही; सेविकांमध्ये गोंधळ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:40 IST

जिल्ह्यात १०७६ अंगणवाडी केंद्र असून, जवळपास तेवढ्याच संख्येत अंगणवाडी सेविका कार्यरत आहेत. अंगणवाडी सेवांमध्ये सुधारणा करण्याच्या उद्देशाने महिला व ...

जिल्ह्यात १०७६ अंगणवाडी केंद्र असून, जवळपास तेवढ्याच संख्येत अंगणवाडी सेविका कार्यरत आहेत. अंगणवाडी सेवांमध्ये सुधारणा करण्याच्या उद्देशाने महिला व बालकल्याण विकास मंत्रालयाने अंगणवाडी सेविकांना तंत्रज्ञानाच्या प्रवाहात आणण्यासाठी स्मार्टफोन दिले. पूर्वी अंगणवाडी सेविकांना सर्व माहिती रजिस्टरमध्ये नोंद करावी लागत असे. मात्र आता अंगणवाडी सेविका मोबाइलद्वारे पोषण आहार स्थिती, कुटुंब व्यवस्थापन, दैनिक आहार, गृहभेट नियोजन, वाढ देखरेख, शिधावाटप नोंद, अंगणवाडी केंद्र व्यवस्थापन मासिक प्रगती अहवाल याबाबतची सर्व माहिती संगणकीय प्रणालीद्वारे भरण्यात येत आहे. केंद्र शासनाच्यावतीने अंगणवाडी सेविकांना पोषण आहाराशी संबंधित माहिती भरण्यासाठी ‘पोषण ट्रॅकर अ‍ॅप’ उपलब्ध करून दिले आहे. मात्र, या अ‍ॅपवर मराठी भाषा नसल्याने अंगणवाडी सेविकांना अडचणी येत आहेत. अ‍ॅपवर इंग्रजी व हिंदी या दोनच भाषांचा समावेश आहे. बालकांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारासंबंधी दैनंदिन माहिती ऑनलाईन व्हावी, यासाठी अंगणवाडी सेविकांना मोबाईल रिचार्जची रक्कम देऊनही माहिती मोबाईल अ‍ॅपवर मराठीतून भरली जात असे. मात्र, १ एप्रिल्पासून केंद्र शासनाच्यावतीने ही माहिती भरण्यासाठी कॉमन ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरमध्ये पोषण ट्रॅकर अ‍ॅप इंग्रजी व हिंदी भाषेतून देण्यात आले आहे. या अ‍ॅपमध्ये माहिती समावेशित केलेल्या लाभार्थींना लाभ दिला जाईल, अशा सूचना दिलेल्या आहेत; परंतु या पोषण ट्रॅकर सॉफ्टवेअरमध्ये मराठी भाषेचा उल्लेख नाही. सर्व माहिती इंग्रजी व हिंदी भाषेत आहे. त्यामुळे ही माहिती भरून घेण्यासाठी अंगणवाडी सेविकांची चांगलीच दमछाक होत आहे. काही ठिकाणी उडणारा गोंधळ दूर करण्यासाठी इंग्रजी भाषा येणाऱ्या व्यक्तीचा आधार घेण्याची वेळ अंगणवाडी सेविकांवर आली आहे. ग्रामीण भागात अगोदरच इंटरनेट सेवा व्यवस्थित मिळत नसल्याने या कामात व्यत्यय येत आहे.

०००

जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्र १०७६

अंगणवाडी सेविका १०७६