शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

चाकूचा धाक दाखवून सोने-चांदीचे दागिने लंपास, पाच चोरट्यांविरुद्ध गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 20:48 IST

महागाव येथील नंदाबाई भीमराव हुंबाड यांच्या घरी २२ ते २३ नोव्हेंबरच्या रात्री तोंडाला पट्टी बांधून असलेल्या चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून २ लाखांवर किमतीचे सोने-चांदीचे दागिने लंपास केले.

रिसोड : तालुक्यातील महागाव येथील नंदाबाई भीमराव हुंबाड यांच्या घरी २२ ते २३ नोव्हेंबरच्या रात्री तोंडाला पट्टी बांधून असलेल्या चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून २ लाखांवर किमतीचे सोने-चांदीचे दागिने लंपास केले. या प्रकरणी दाखल फिर्यादीवरून पाच चोरट्यांविरुद्ध रिसोड पोलिसांनी २३ नोव्हेंबर रोजी गुन्हे दाखल केले. या घटनेमुळे गावात मोठी खळबळ माजली आहे.याबाबत नंदाबाई हुंबाड यांनी पोलिसांत नोंदविलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे, की २२ नोव्हेंबरच्या रात्री जेवण झाल्यानंतर कुटुंबातील सर्व सदस्य झोपी गेले. मध्यरात्रीच्या सुमारास घरातील जिन्यामधून तोंडाला पट्टी बांधून असलेल्या पाच चोरट्यांनी घरात प्रवेश केला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर आरडोओरड केली असता, त्यातील एका चोरट्याने चाकू काढून धाक दाखविला. यावेळी दुसऱ्या एका चोरट्याने झोपलेल्या मुला-मुलीवर जाऊन आवाज केल्यास कु-हाडीने जीवे मारण्याची धमकी दिली. या चोरट्यांपैकी एकाच्या तोंडावरील कपडा घसरल्याने आपण त्यास ओळखले असून, तो सोयाबीनचे खळे करणारा बाळू लक्ष्मण चव्हाण (प्रतापपूर, ता. मेहकर) येथील असल्याचे फिर्यादीने नमूद केले. जीवाच्या भीतीने मी व माझ्या मुलांनी अंगावरील सोने काढून दिले. नंतर चोरट्यांनी घरातील कपाट उघडून त्यातील सोन्याच्या अंगठ्या व चांदीचे दागिने, मोबाईल असा एकंदरित २ लाख १० हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. तब्बल दोन तास चोरट्यांनी आम्हाला घरात अत्यंत दहशतीत ठेवले. अशा आशयाच्या फिर्यादीवरून पोलिसांनी पाचही चोरट्यांविरुद्ध भादंविचे कलम ३९५, ४२७ अन्वये गुन्हे दाखल केले..............गावक-यांनी केला चोरट्यांचा पाठलाग!नंदाबाई हुंबाड यांच्या घरावर दरोडा टाकून चोरट्यांनी सुधाकर मवाळ यांच्या गोइ्यातील सोयाबिनचे पोते लंपास केले. इथपर्यंत चोरट्यांनी ठरविल्यानुसार सर्व घडत असतानाच त्यातील एकाने उभ्या ट्रॅक्टरच्या चाकात चाकू भोसकल्याने त्यातील हवेचा जोरदार आवाज होवून मजूर जागे झाले. त्यांनी पळणा-या चोरट्यांचा पाठलाग करून बाळू लक्ष्मण चव्हाण यास ताब्यात घेतले. त्याला रिसोड पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून पुढील तपास रिसोड पोलिस करित आहे.