शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

चोरी प्रकरण; सात अट्टल आरोपी गजाआड

By admin | Updated: January 30, 2016 02:27 IST

वाशिम जिल्ह्यातील चार पोलीस स्टेशनची संयुक्त कारवाई; चोरट्यांकडून १४.८0 लाखांचा मुद्देमाल जप्त.

मंगरूळपीर/अनसिंग (जि. वाशिम): विविध प्रकारच्या चोर्‍या करून जिल्हा हादरून टाकणार्‍या टोळीला जेरबंद करण्यात अखेर पोलीस प्रशासनाला यश आले आहे. आसेगाव, मंगरूळपीर, अनसिंग व जऊळका या चार पोलीस स्टेशनने राबविलेल्या संयुक्त कारवाईत वाशिम तालुक्यातील माळेगाव येथून सात अट्टल आरोपी २९ जानेवारीच्या पहाटेच्या सुमारास जेरबंद झाले. चोरट्यांकडून जवळपास १४ लाख ८0 हजार रुपयांचा माल जप्त केला. जिल्हय़ातील आसेगाव, मंगरूळपीर, अनसिंग व जऊळका पोलीस स्टेशनअंर्तगत येणार्‍या गावांना चोरट्यांनी टार्गेट करून अक्षरश: धुमाकूळ घातला होता. लाखमोलाच्या शेतमालासह मोटारसायकल व शेतीपयोगी साहित्य लंपास करून चोरट्यांनी नवीन पोलीस अधीक्षकांना जणू सलामीच दिली होती. पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांनी चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी सर्व पोलीस अधिकार्‍यांना सतर्कतेच्या सूचना दिल्या. वाशिम तालुक्यातील माळेगाव येथे चोरट्यांची टोळी अधून-मधून येत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरून प्रशांत होळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचण्यात आला. अतिरिक्त पोलीस अधीक्षक अंबादास गांगुर्डे, मंगरूळपीरचे उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रय वाळके, मंगरूळपीरचे ठाणेदार अनिलसिंग गौतम, आसेगावचे ठाणेदार सुनील अंबुलकर, जऊळका ठाणेदार किरण साळवे, अनसिंगचे ठाणेदार डी.एम. घुगे यांनी ताफ्यासह २८ जानेवारीच्या रात्री १२ वाजेपासून माळेगावात तळ ठोकला. पहाटे ३ वाजतादरम्यान आरोपीच्या घरावर छापा टाकून निंबाजी राघोजी जाधव (५५), गजानन भीमराव जाधव (२५), मारोती निंबाजी जाधव (२0), अर्जुना निंबाजी जाधव (६५), संतोष निंबाजी जाधव (२५) सर्व रा. माळेगाव व भूजंग दादाराव काळे (२६) रा. पार्डी टकमोर, पांडुरंग गुलाब तांगडे (२५) रा.इचोरी या आरोपींना जेरबंद केले. पोलीस खाक्या दाखविताच सर्व आरोपींनी चोरी केलेल्या मुद्देमालाची माहिती दिली. नऊ मोटारसायकली, सोयाबीन पोते, कंपाऊंड तार, बोलेरो पिक अप, ज्वारी, फ्रीज, आटा चक्की, ताडपत्री, पाण्याच्या टाक्या, हवा भरण्याची मोटर असा एकूण १४ लाख ८0 हजारांचा माल जप्त केला. आरोपींविरुद्ध भादंवि कलम ४५७, ३८0 अन्वये गुन्हा दाखल केला.