शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

कारंजात भरदिवसा चोरी; २५ लाखांचा मुद्देमाल लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:42 IST

कारंजा लाड : कारंजा येथील गुरुदेवनगरात अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा एक घर फोडून २५.५० लाखांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना २५ ...

कारंजा लाड : कारंजा येथील गुरुदेवनगरात अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा एक घर फोडून २५.५० लाखांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना २५ एप्रिल रोजी सायंकाळी पावणेसहा वाजताच्या दरम्यान उघडकीस आली. दरम्यान, घरमालकाच्या फिर्यादीवरून कारंजा शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

कारंजा शहरातील बायपास परिसरातील गुरुदेवनगरात नगरे दाम्पत्य राहत असून ते कारंजा तालुक्यातील रामनगर येथील जि. प, शाळेवर शिक्षक म्हणून कार्यरत आहे. २५ एप्रिल रोजी नगरे दाम्पत्य दारव्हा तालुक्यातील हरूगोंडेगाव येथे अत्यावश्यक कामासाठी गेले होते. त्यानंतर सायंकाळी ५.५० वाजता ते घरी परत आले असता घराचे मुख्य प्रवेशद्वार लावल्याचे, तर घराचे दरवाजे थोडे उघडे असल्याचे व दाराचे कुलूप खाली पडल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर घरात जाऊन पाहणी केली असता बेडरूममधील दोन खाण्याची रॅक उघडी दिसली. अज्ञात चोरट्यांनी सोन्याचा ७५ ग्रॅम वजनाचा राणीहार, १२० ग्रॅम वजनाच्या चार पाटल्या, २७ ग्रॅम वजनाच्या तीन अंगठ्या, २७ ग्रॅम वजनाचा राणीहार असे नवीन ठेवलेले दागिने व ५० ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र, ३० ग्रॅम वजनाचा सोन्याचा पोहेहार, ५२ ग्रॅम वजनाची दोन नेकलेस व अन्य दागिने असा एकूण २५ लाख ५० हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांवर हात साफ केला. घरमालक मोतीराम तुकाराम नगरे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी भांदविच्या कलम ४५४ व ३८० नुसार गुन्हा दाखल केला. घटनेचा अधिक तपास ठाणेदार पाटील यांच्या मार्गदर्शनात शहर पोलीस करीत आहे.

दरम्यान, चोरीच्या तपासासाठी श्वानपथक व ठसेतज्ज्ञांची मदत घेण्यात आली; परंतु त्यात यश आले नाही. शहरात कोरोना लॉकडाऊनच्या काळात दिवसाढवळ्या चोरी झाल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी कारंजा येथे भेट देऊन घटनेची माहिती घेतली व तपासाबाबत पोलिसांना आवश्यक त्या सूचना केल्या.