शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

ठाणेदाराने केली युवकास शिवीगाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2017 01:13 IST

वाशिम : घरगुती वादाचा विषय पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाल्यावर या वादातील दुसर्‍या पक्षातील एका युवकास वाशिम शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार विजय पाटकर यांनी भ्रमणध्वनीवरून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून, धमकी दिल्याची तक्रार मानवाधिकार संघटनेचे अध्यक्ष गजानन भिसडे यांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे १४ ऑगस्ट रोजी केली. 

ठळक मुद्दे पोलीस अधीक्षकांकडे तक्रार संवाद मोबाइलमध्ये कैद!

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : घरगुती वादाचा विषय पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाल्यावर या वादातील दुसर्‍या पक्षातील एका युवकास वाशिम शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार विजय पाटकर यांनी भ्रमणध्वनीवरून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून, धमकी दिल्याची तक्रार मानवाधिकार संघटनेचे अध्यक्ष गजानन भिसडे यांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे १४ ऑगस्ट रोजी केली. यासंदर्भात भिसडे यांनी तक्रारीत नमूद केले आहे, की त्यांची मावस बहीण प्रीती हिचे वाशिमच्या काळे फाइल येथील गजानन खंदारे यांच्याशी लग्न झाले असून, ते सध्या परभणी येथे पोलीस कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. काही घरगुती कारणास्तव प्रीती ही माहेरी राहत आहे. पती-पत्नीमधील वाद सोडविण्याकरिता प्रीतीचे नातेवाईक प्रयत्न करीत आहेत. यासाठी भ्रमणध्वनीवर बोलून तसेच प्रत्यक्ष भेटून आपसात समेट घडविण्याचा प्रयत्न सुरू आहे. यादरम्यान प्रीतीच्या वडिलांनी गजानन खंदारे यांचे वडील उद्धव खंदारे यांना फोन करून झाले गेले ते विसरुन जाऊन प्रीती आणि तिच्या पतीला नव्याने संसार सुरू करण्याची विनंती केली; परंतु उद्धव खंदारे यांनी चुकीची व खोटी तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दिली. या प्रकरणात ठाणेदार पाटकर यांनी प्रीती हिचा भाऊ राहुल जाधव यास भ्रमणध्वनी करून, ईल भाषेत शिवीगाळ केली व पोलीस स्टेशनला ये, तुला पोलिसी हिसका दाखवतो, अशा स्वरूपात राहुलला धमकीदेखील दिली. सदर घरगुती वादाच्या प्रकरणाची वस्तुस्थिती जाणून न घेता तसेच समेट घडविण्याऐवजी पोलीस निरीक्षक पाटकर यांनी जाधवला भ्रमणध्वनीवर ईल शिवीगाळ केली. तथापि, ठाणेदार पाटकर यांच्यावर त्वरित कारवाई करावी; अन्यथा लोकशाही पद्धतीने आंदोलनात्मक पवित्रा घेण्यात येईल, असे भिसडे यांनी तक्रारीत नमूद केले आहे. 

राहुल जाधव याच्याविरूद्ध वाशिम शहर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंद आहे. त्यानुषंगाने चौकशी करण्यासाठी जाधव यास वारंवार बोलावूनसुद्धा तो हजर झाला नाही.  त्यामुळेच आपण त्यास फोन करून हजर राहण्यास सांगितले; परंतु तो एकेरी संवाद साधायला लागल्यानेच त्यास केवळ ‘बायल्या’ म्हणून संबोधले.  - विजय पाटकरठाणेदार, शहर पोलीस स्टेशन