शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

महा अवयवदान अभियानाची जनजागृती थंडावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 01:19 IST

वाशिम : राज्यभरात अवयवदान चळवळीला गती मिळावी, यासाठी शासन स्तरावरून ‘महा अवयवदान अभियान २0१७’ची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. मात्र, यासंदर्भातील जनजागृती केवळ धार्मिक उत्सवांमध्येच होताना दिसून येत असून, गठित करण्यात आलेल्या विविध समित्यांचे कार्यदेखील थंडावल्यामुळे अभियानाचा अपेक्षित प्रचार-प्रसार होणे कठीण झाले आहे. 

ठळक मुद्देप्रशासकीय उदासीनता प्रचार-प्रसाराला ब्रेक

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राज्यभरात अवयवदान चळवळीला गती मिळावी, यासाठी शासन स्तरावरून ‘महा अवयवदान अभियान २0१७’ची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. मात्र, यासंदर्भातील जनजागृती केवळ धार्मिक उत्सवांमध्येच होताना दिसून येत असून, गठित करण्यात आलेल्या विविध समित्यांचे कार्यदेखील थंडावल्यामुळे अभियानाचा अपेक्षित प्रचार-प्रसार होणे कठीण झाले आहे. महा अवयवदान अभियानाबाबत १८ ऑगस्ट २0१७ रोजी अमरावती विभागीय महसूल आयुक्तांनी जिल्हा समित्यांसोबत ‘व्ही.सी.’व्दारे चर्चा करून अभियानाला गती देण्यासंदर्भात चोख नियोजन केले होते. त्यानंतर २३ ऑगस्ट रोजी प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकार्‍यांनीही जिल्हा समिती आणि तालुकाध्यक्षांसमवेत या अभियानाच्या अंमलबजावणीचे जिल्हा स्तरावरील नियोजन केले. मात्र, अभियानाची प्रभावी जनजागृती आणि चोख अंमलबजावणीबाबत प्रशासनाने अद्याप विशेष पुढाकार घेतलेला नाही. म्हणायला, गणेशोत्सवादरम्यान बोटावर मोजण्याइतपत गणेशोत्सव मंडळांनी चार-दोन बॅनर लावून अभियानाची जनजागृती करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. मात्र, तो निश्‍चितपणे पुरेसा नसल्याचे मत सुज्ञ नागरिकांमधून व्यक्त होत आहे. 

गणेशोत्सवामध्ये महा अवयवदानासंबंधी जनजागृती करण्याचे शासनाचे निर्देश होते. त्यानुसार, काही गणेश मंडळांना हाताशी धरून चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धेच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. त्यानंतर मात्र शासनाकडून जनजागृतीबाबत कुठलेच ठोस निर्देश प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे जनजागृती थंडावली आहे.               - जनार्दन जांभरूणकरनिवासी वैद्यकीय अधिकारी, वाशिम