शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

मंदिरेच बनली असुरक्षित!

By admin | Updated: October 31, 2014 01:37 IST

वाशिम जिल्ह्यात धार्मिक स्थळांमधील चो-यांच्या घटनांत वाढ,मंदिरांची सुरक्षितता ऐरणीवर

संतोष वानखडे/वाशिमजिल्ह्यात अलिकडच्या काळातील धार्मिक स्थळांमधील चोर्‍यांच्या घटनांनी मंदिरांची सुरक्षितता ऐरणीवर आणली आहे. अलिकडच्या काळात सहा मंदिरांमधून चार लाख १२ हजार ७८८ रुपयांचे देव-देवतांचे साहित्य चोरीला गेले असल्याची नोंद पोलिस दप्तरी आहे.जिल्ह्यात नोंदणीकृत ५२२ मंदिरे असून, मंदिरातील जमा होणारी देणगी, दानपेट्या, देवतांचे दागदागिने, सोन्या चांदीच्या वस्तू यावर डोळा ठेवून चोरट्यांनी गेल्या दोन वर्षांच्या काळात जिल्ह्यातील काही छोट्या-मोठय़ा मंदिरातही डल्ला मारला आहे. त्यातील काही चोर्‍या उघड झाल्या असल्या तरी पोलिस खाते व धर्मादाय आयुक्त यांच्या सूचनांनंतरही संबंधित मंदिर व्यवस्थापनांनी चोरी होऊ नये, यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या नसल्याचेच मंदिरातील चोरी प्रकरणातून अधोरेखित झाले असून, त्यामुळे मंदिरातील ह्यदेवह्णच असुरक्षित झाले असल्याचे दिसून येते. अलिकडच्या काळातील धार्मिक स्थळांमधील चोरीच्या घटना अशा आहेत. अंबेझर पार्श्‍वनाथ डिगंबर जैन मंदिर नगर परिषद चौक वाशिम येथे १८ मार्च २0१३ रोजी तीन हजार रुपये किमतीच्या साहित्याची चोरी झाली होती. गुरुवार बाजार काटीवेश वाशिम येथील श्री संभवनाथ श्‍वेतांबर जैन मंदिर येथून ४0 हजाराची चोरी, मूर्तीवरील चांदीचे छत्र चोरीला गेले होते. १४ जानेवारी २0१३ रोजी घटना घडली. याप्रकरणी पोलिस स्टेशनला तक्रार देण्यात आली नव्हती. आसोला येथील सोमनाथ मंदिरामध्ये ७ मार्च २0१४ रोजी दोन लाख ५0 हजाराच्या साहित्याची चोरी झाली होती. मालेगाव येथील गजानन महाराज मंदिरात १ सप्टेंबर २0१४ रोजी २५ हजार ५00 रुपयांच्या साहित्यावर चोरट्यांनी हात साफ केला होता. मंगरुळपीर तालुक्यातील पारवा येथील जगदंबा मंदिरातून १२ जानेवारी २0१३ रोजी ८४ हजार २८८ रुपयांचे साहित्य चोरट्यांनी लंपास केले होते. मानोरा तालुक्यातील रामगव्हाण येथील संस्थानमधून २९ जुलै २0१३ रोजी मूर्तीची चोरी झाली होती. जिल्ह्यात अनेक पुरातन मंदिरे आहेत. त्यामध्ये अनेक जुन्या घडणीच्या मूर्ती आहेत. अशा मूर्तींवरही चोरट्यांचे लक्ष असते. त्यामुळेच भविष्यकाळात मंदिर विश्‍वस्त संस्था व नोंदणी न झालेल्या मंदिरांच्या व्यवस्थापन संस्थांनी मंदिराच्या सुरक्षिततेबाबत काळजी घेणे अत्यंत आवश्यक ठरणार आहे.