शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

तापमानात वाढ; फळबागांचे अस्तित्व धोक्यात!

By admin | Updated: February 2, 2016 01:57 IST

वाशिम जिल्हय़ात विविध रोगांचा प्रादुर्भाव.

वाशिम: गत तीन दिवसांपासून तापमानात वाढ होत असल्यामुळे फळबागांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. जिल्हय़ात मंगरूळपीर, मानोर्‍यासह अन्य तालुक्यांमध्ये डाळिंब, केळी, संत्रा, पपईच्या फळबागा आहेत. ओलिताची व्यवस्था असलेल्या शेतकर्‍यांनी हजारो हेक्टरवर या झाडांची पेरणी करण्यात आली आहे. यावर्षी पाऊस कमी असल्यामुळे आधीच पाण्याअभावी फळबागा संकटात सापडल्या होत्या. यावर्षी सुरुवातीपासूनच पाऊस कमी पडला. तसेच थंडीही पडली नाही. त्यातच गत तीन ते चार दिवसांपासून तापमानात अचानक वाढ झाली आहे. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंंत नेहमी थंड वातावरण असते; मात्र यावर्षी जानेवारीच्या अखेरच्या आठवड्यातच तापमान वाढायला सुरुवात झाली आहे. सध्या दिवसा ३५ डिग्री सेल्सिअस तर रात्री १५ डिग्री सेल्सिअस तापमान आहे. गत आठ दिवसात दिवसाच्या तापमानात सात ते आठ डिग्रीने वाढ झाली आहे. त्यामुळे संत्रा, डाळिंब यासारख्या फळांवर विविध किडींचे व रोगांचे आक्रमण होण्याची शक्यता आहे. तापमानात वाढ झाल्यामुळे फळांचा आकार कमी होणार आहे. तापमान जास्त असले तर फळांचा आकार वाढत नाही. तसेच उत्पादनातही घट येण्याची शक्यता आहे. यासोबत फळांना भेगा पडण्याला सुरुवात झाली आहे. डाळिंब व संत्रासारख्या फळांना तापमानात वाढ झाली तर भेगा पडतात. त्यामुळे फळातील रस कमी होऊन फळे सुकतात. तसेच फळांवर डागही पडतात. त्यामुळे फळे खराब होतात व बाजारात ग्राहक खरेदी करीत नाहीत. या वाढत्या तापमानामुळे फळबागाधारक शेतकरी त्रस्त झाले असून, यावर्षी त्यांना नुकसानाचा सामना करावा लागणार आहे. आधीच तीन वर्षांंंपासून सातत्याने कमी पाऊस पडत असल्यामुळे फळबागा सुकल्या आहेत. अनेक शेतकर्‍यांनी संत्रा व केळीच्या बागा कापल्या आहेत. यावर्षी आणखी फळबागा कमी होण्याची शक्यता आहे. रब्बी हंगामातील जिल्हय़ातील गहू व हरभरा हे मुख्य पीक आहे. हजारो हेक्टरवर याची पेरणी करण्यात आली आहे; मात्र तापमानात वाढ झाल्यामुळे ही पिकेही धोक्यात आली आहे. सध्या हरभरा व गहू हे दाणे भरण्याच्या स्थितीत आहे; मात्र थंडी गायब झाल्याने दाणे भरण्याच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण होत असून, दाणे बारीक होतात. परिणामी बाजारात विक्रीला गेल्यावर चांगला भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.