शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पाचवी व आठवीचा वर्ग जोडण्यासाठी शिक्षक संघटनांचे साकडे

By admin | Updated: May 5, 2017 19:21 IST

जिल्हा परिषद शाळेला पाचवी व आठवीचे वर्ग जोडण्याची मागणी विविध शिक्षक संघटनांनी शिक्षण सभापती सुधीर पाटील गोळे यांच्याकडे शुक्रवारी केली.

वाशिम : जिल्ह्यातील अनेक प्राथमिक व उच्च प्राथमिक शळामध्ये इयत्ता ४ थी व ७ वी मध्ये योग्य पटसंख्या असतांनासुध्दा इयत्ता ५ वी व ८ वीचे वर्ग जोडण्यात आलेले नाहीत. जिल्हा परिषद शाळेला पाचवी व आठवीचे वर्ग जोडण्याची मागणी विविध शिक्षक संघटनांनी शिक्षण सभापती सुधीर पाटील गोळे यांच्याकडे शुक्रवारी केली.बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमन २००९ अंतर्गत शिक्षणाची सोय उपलब्ध करुन देण्याचे शासनावर बंधनकारक आहे. तसेच नवीन शैक्षणिक धोरणानुसार इयत्ता १ ली ते पाचवीपर्यंत प्राथमिक व इयत्ता ६ वी ते ८ वी पर्यंत उच्च प्राथमिक असा स्तर निश्चित करण्यात आलेला आहे. यानुसार चवथ्या वर्गाला पाचवा वर्ग जोडणे आणि सातव्या वर्गाला आठवा वर्ग जोडणे गरजेचे आहे. जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये इयत्ता पाचवी आणि आठवी सुरु करण्यास विलंब होत असल्याचा आरोप शिक्षक संघटनांनी केला. शिक्षण विभागाने नवे वर्ग निर्मितीचा प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षण समितीकडे सादर करण्याची मागणी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली. गतवर्षी तोंडी सुचना देवुन ग्राम शिक्षण समिती, शाळा व्यवस्थापन समितीच्या ठरावानुसार काही शाळांमध्ये इयत्ता आठवी व पाचवीचे वर्ग सुरु झाले. इतर ठिकाणी सदर वर्ग सुरू करावे यासंदर्भात सभापती गोळे यांच्याशी चर्चा करण्यात आली. सद्यस्थितीत अतिरिक्त शिक्षकांची संख्या वाढली आहे. वर्गजोड करण्यात आली तर शाळेतील विद्यार्थी पटसंख्या वाढुन शिक्षक अतिरिक्त होणार नाहीत व विद्यार्थ्यांना सुध्दा स्वगावी शिक्षण घेता येईल, हा मुद्दा शिक्षकांनी पटवून दिला. काही दिवसांपुर्वी जिल्हयातील जवळपास ३५० शिक्षकांच्या विषय शिक्षक म्हणुन उच्च प्राथमिक शाळांवर नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.  त्या शिक्षकांना विषयाची वाटणी, वर्कलोड व तासिकांचे नियोजन यासाठी वर्ग ६ ते ८ अशी रचना आवश्यक आहे. या सर्व बाबी विचारात घेता जिल्ह्यातील सर्वच शाळांमधये  इयत्ता ५ वी व ८ वीचे वर्ग सुरु करण्याबाबत शिक्षक संघटनांच्या कृती समितीने शिक्षण सभापती सुधीर गोळे यांची भेट घेवुन चर्चा केली.  या शिष्टमंडळात  विजय मनवर, देवबा शिंदे, विनोद राजगुरु, दत्तराव इढोळे, पुरुषोत्तम तायडे, हेमंत तायडे, संतोष शिकारे, रा.सु.इंगळे, किसन राजे, शत्रुघ्न गवळी, राहुल इंगोले, अनिल पाटील, खुशाल राऊत यांचेसह शिक्षकांची उपस्थिती होती.