शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

Teacher's Day Special : शिक्षकांमुळेच माणुसकी, नैतिकतेचे धडे मिळाले...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2020 12:45 IST

‘आयएमए’चे वाशिम जिल्हाध्यक्ष डॉ. अनिल कावरखे यांनी शिक्षकांप्रती आदर व्यक्त केला.

- संतोष वानखडेलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : पुस्तकी ज्ञान देण्याबरोबरच जीवन कसे जगावे, नैतिकता, माणूस म्हणून जगण्याचे धडे शिक्षकांकडूनच मिळाले, अशा शब्दात वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी तथा ‘आयएमए’चे वाशिम जिल्हाध्यक्ष डॉ. अनिल कावरखे यांनी शिक्षकांप्रती आदर व्यक्त केला.

शिक्षकांच्या शिकवणीमुळेच कोरोना वार्डात सेवा देतोय..जीवनात माणुसकीला महत्व दे, प्रत्येकाकडे एक माणूस म्हणून बघ, शक्य असेल तेव्हा त्यांची नि:स्वार्थ भावनेतून सेवा कर अशी शिकवण गुरूजनांकडून मिळाली. या शिकवणीमुळेच आज जिल्हा रुग्णालयात कोरोना वार्डमध्ये न घाबरता रुग्ण सेवा देऊ शकत आहे. आयुष्यात शेवटच्या श्वासापर्यंत रूग्णसेवा करीतच राहणार.

नाईक सर म्हणायचे नितिमत्ता सोडू नको...गोरेगाव (जि. हिंगोली) येथील जिल्हा परिषद शाळेत माध्यमिक शिक्षण घेत असताना जे. एस.नाईक सरांनी नितिमत्तेने जगायचे कसे हे शिकविले. ते नेहमी सांगायचे की, ज्या दिवशी मला कळेल की, तु तुझी नितिमत्ता सोडली, तो दिवस माझ्या आयुष्यातील अत्यंत दु:खी असेल व तुला शिकविण्यामध्ये मी कमी पडलो, असे मानेल.त्यांचे हे शब्द माझ्या थेट काळजात भिडले. त्यांच्या अपघाती निधनानंतर अंत्यसंस्काराच्या वेळी त्यांच्या मृतदेहासमोर वचन दिले की, मी जिवनात असे कधीही वागणार नाही, नितिमत्ता सोडणार नाही.

डॉ. गंगा सरांनी बारकावे शिकविलेनांदेड येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसचे शिक्षण घेत असताना अ‍ॅनाटॉमीचे डॉ. गंगा सरांनी वैद्यकीय शिक्षणातील बारकावे शिकविले.मुलाप्रमाणे सांभाळले. त्यांची शिकवण कदापिही विसरू शकणार नाही.आज जिवनात जेवढा यशस्वी आहे ते या सर्व गुरुजनांमुळेच.....

गुरूजनांमुळेच मी घडलो...जि.प. प्राथमिक शाळा गोरेगाव येथे भास्करराव आहेर सरांनी प्राथमिक शिक्षणाचे बाळकडू पाजले. ते अत्यंत मेहनती होते. विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी जिवाचे रान करायचे. भास्करराव आहेर सरांनी शांतता, संयम, शिस्त या गुणांची शिकवण दिली. के. डी. जोशी सरांनी शिस्तीचे धडे दिले. उच्च माध्यमिक आदर्श महाविद्यालय हिंगोली येथे रसायनशास्त्रचे प्रा. बोथरा यांनी पुढील दिशा देण्याचे महत्वाचे कार्य केले.

आई-वडील हे माझे जीवनातील प्रथम गुरू. शिक्षण घेत असताना पुस्तकी ज्ञानाबरोबरच माणुसकीच्या जीवनाचे प्रात्यक्षिक धडे देणारे शिक्षकही मला मिळाले, हे मी माझे भाग्यच समजतो.

- डॉ. अनिल कावरखे