शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांच्या जीपीएफ पावत्यांचा हिशोब जूळेना !

By admin | Updated: May 6, 2017 01:47 IST

वाशिम जिल्हा परिषद; पावत्यांच्या शोधासाठी धावपळ.

वाशिम: गत दोन वर्षांंपासून शिक्षकांच्या जीपीएफ (भविष्य निर्वाह निधी) पावत्यांचा हिशोब जूळवून आणण्यात वित्त विभागाला अद्यापही यश आले नाही. दोन वर्षांपासूनच्या जीपीएफचा लेखाजोखा नसल्याने ह्यहिशोबह्ण गहाळ तर झाला नाही ना? अशी शंका शिक्षकांमधून वर्तविली जात आहे.वाशिम जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या जवळपास ७७३ प्राथमिक शाळा आहेत. या शाळांवर तीन हजारापेक्षा अधिक शिक्षक कार्यरत आहेत. सेवानवृत्तीनंतर आर्थिकदृष्ट्या भविष्याची तजवीज म्हणून भविष्य निर्वाह निधीत एकूण वेतनाच्या किमान १0 टक्के रक्कम जमा केली जाते. ही रक्कम शिक्षकांच्या नियमित वेतनातून कपात केली जाते. भविष्य निर्वाह निधीची रक्कम नेमकी किती जमा होत आहे, ही रक्कम वेतनातून नियमित कपात होते की नाही आदींची माहिती असावी म्हणून शिक्षकांना आर्थिक वर्ष संपल्यानंतर साधारणत: मे किंवा जून महिन्यात महिनानिहाय जीपीएफच्या पावत्या दिल्या जातात. सन २0१४-१५ या आर्थिक वर्षातील जीपीएफच्या पावत्या सप्टेंबर २0१५ मध्ये मिळाल्या होत्या. तेव्हापासून आजतागायत कुणालाही जीपीएफची पावती मिळाली नाही. त्यामुळे जीपीएफच्या खात्यात नेमकी किती रक्कम आहे, याचा कोणताही अंदाज शिक्षकांना नाही. सदर पावत्या मिळाव्या, या मागणीसाठी जिल्हा परिषदेच्या वित्त व लेखा विभागाकडे तसेच मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडे शिक्षक संघटनांनी वारंवार पाठपुरावा केला. मात्र, आश्‍वासनाखेरीज शिक्षकांच्या पदरी काहीच पडले नाही. सन २0१५-१६ पासून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांना जीपीएफ पावत्या मिळाल्या नसल्याचा प्रकार हा मी रूजू होण्यापूर्वीपासनूच आहे. मी रूजू झाल्यानंतर यासंदर्भातील सविस्तर माहिती घेतली. शिक्षकांना जीपीएफ पावत्या लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न आहे.- रवीन्द्र येवलेमुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद, वाशिम.सन २0१५-१६ या वर्षापासूनच जीपीएफच्या पावत्या मिळण्यासाठी संबंधित यंत्रणेकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला. मात्र, आश्‍वासनापलिकडे ठोस कार्यवाही झाली नाही. येत्या काही दिवसातच जीपीएफच्या पावत्या मिळतील, असे सांगण्यात आले आहे. येत्या १0-१२ दिवसात पावत्या मिळाल्या नाहीत तर पुन्हा संबंधित यंत्रणेकडे पाठपुरावा केला जाईल.- विजय मनवरपदाधिकारी, शिक्षक संघटना.