शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
2
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
3
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
4
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
5
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
6
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
7
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
8
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
9
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
10
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
11
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
12
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
13
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
14
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
15
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
16
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
17
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
18
IND vs PAK Asia Cup 2025 Final Live Streaming : भारत-पाक 'महायुद्ध'! कुठं अन् कशी पाहता येईल ऐतिहासिक फायनल?
19
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
20
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना

पतसंस्थेच्या संभाव्य निवडणुकीकडे शिक्षकांचे लक्ष !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:40 IST

साधारणत: सव्वा पाच वर्षांपूर्वी वाशिम जि. प. शिक्षक सहकारी पतसंस्थेची निवडणूक झाली होती. या पतसंस्थेच्या संचालक मंडळाचा पाच वर्षांचा ...

साधारणत: सव्वा पाच वर्षांपूर्वी वाशिम जि. प. शिक्षक सहकारी पतसंस्थेची निवडणूक झाली होती. या पतसंस्थेच्या संचालक मंडळाचा पाच वर्षांचा कार्यकाळ १ जानेवारी रोजी संपुष्टात आला. दरम्यान, कोरोनामुळे सहकारी पतसंस्थेच्या निवडणुका ३१ मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. एप्रिलनंतर केव्हाही निवडणूक कार्यक्रम घोषित होऊ शकतो किंवा कोरोनाचे संकट कायम राहिल्यास निवडणूक लांबणीवरही पडू शकते, असा अंदाज शिक्षक संघटनांमधून वर्तविला जात आहे. ऐनवेळी धावपळ नको म्हणून शिक्षक संघटना कामाला लागल्या असून, शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी चढाओढ लागल्याचे दिसून येते.

वाशिम जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची वार्षिक उलाढाल ६० ते ७० कोटींच्या घरात असून, एकूण सभासद संख्या २५६० आहे. कर्जाचा नियमित भरणा करणाऱ्या शिक्षक सभासदांना मतदानाचा अधिकार आहे. जिल्ह्यातील २४००च्या आसपास शिक्षक हे मतदार म्हणून पात्र ठरू शकतात. कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची निवडणूक ही शिक्षक संघटनांमध्ये प्रतिष्ठेची म्हणून गणली जाते. पतसंस्था ताब्यात ठेवण्यासाठी सत्ताधारी तर पतसंस्थेवर ताबा मिळविण्यासाठी विरोधकांनी कंबर कसल्याने यावेळची निवडणूक अतितटीची होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. कोरोनाकाळातही शिक्षकांशी संबंधित विविध प्रश्न घेऊन विविध शिक्षक संघटनांची नेते मंडळी जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या शिक्षण विभागात ठाण मांडून बसत असल्याचे चित्र पाहावयास मिळते.

०००

बॉक्स

गुरुजीही राजकारणात आघाडीवर !

शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या संभाव्य निवडणूक निमित्ताने गुरुजींमधील राजकारण पाहावयास मिळते. आरोप-प्रत्यारोपामुळे शिक्षक पतसंस्थेची निवडणूक ही राजकीय क्षेत्रात चर्चेचा विषय बनते. मुलूख मैदानी तोफ म्हणून ओळख असणाऱ्या काही शिक्षक नेत्यांना आपल्या गटात सहभागी करून घेत प्रतिस्पर्ध्यांचे मनसुबे धुळीस मिळविण्यात कुठलीही कसर ठेवली जात नसल्याची चर्चा आहे. फोडाफोडीच्या या राजकारणात गुरुजीही आघाडीवर असल्याचे निवडणूक निमित्ताने दिसून येते.