शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

थकबाकीदारांच्या घरांसमोर बॅन्ड वाजवून कर वसुली

By admin | Updated: March 13, 2017 02:18 IST

कारंजा नगर परिषदेचा उपक्रम ; नागरिकांमध्ये कुतूहल.

कारंजा लाड, दि. १२- २0१५-१६ आर्थिक वर्ष संपत आले असून, शासकीय कार्यालयांनी थकीत कर्जवसूलीला वेग दिला आहे. येथील नगर पालिकेने तर करवसूलीसाठी अजब फंडा अवलंबविला आहे. मालमत्ता कर थकबाकीदारच्या घरासमोर बँड वाजवून त्याला कराचा भरणा करण्यासाठी प्रवृत्त केले जात असल्याने या उपक्रमाबद्दल नागरिकांत कुतूहल निर्माण झाले आहे. चालू आर्थिक वर्षात कारंजा नगरपरिषदेचे सरासरी ४ कोटी २५ लाख रूपये वसूली उद्दिष्ट आहे. नोटाबंदीच्या काळात मोठय़ा संख्येने थकबाकीदारांनी कराचा भरणा केला आहे. तरीही अद्याप २ कोटी २५ लाख रुपये करापोटी वसूल होणे बाकी आहेत. या पृष्ठभूमीवर कर वसूल करण्यासाठी पालिका प्रशासनाने नोटीसा, सूचना देऊनही थकबाकीदारांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने मुख्याधिकारी वानखडे यांनी करवसूलीचा वेगळाच फंडा शोधून काढला आहे. ज्यांच्याकडे नगर परिषदेचा मालमत्ता कर थकबाकी आहे त्याचे घर अथवा प्रतिष्ठानासमोर बँड वाजविल्या जातो. थकबाकीदारला संकोच वाटतो व तो मालमत्ता कर भरणा करण्यास प्रवृत्त होतो. त्यामुळे असल्याने वसूलीचा हा फंडा कितपत यशस्वी होतो, हे पाहणे औत्स्युक्याचे ठरेल.

 -नगरपरिषद हद्दीतील करधारकांना सूचना, नोटीसा देवूनही काही जण याकडे टाळाटाळ करीत असल्याने हा उपक्रम हाती घेण्याची वेळ आली. या उपक्रमाचा चांगलाच फायदा झाला असून थकबाकीदार कराचा भरणा करतांना दिसून येत आहे. कर भरणार्‍यांचा असाच फ्लो राहिल्यास मार्च महिन्याच्या शेवटपयर्ंत थकित करवसूलीचे उद्दिष्ट पूर्ण होण्यास वेळ लागणार नाही.

- प्रमोद वानखडे मुख्याधिकारी, नगरपरिषद कारंजा