शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणच्या कर्मचाऱ्यांना थकबाकी वसुलीसाठी कारवाईचे टार्गेट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 12:10 IST

MSEDCL NEWS : कर्मचाऱ्यांना थकबाकीदार ग्राहकांचा थेट वीज पुरवठा खंडित करण्याचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: कोरोना काळात वसुलीपेक्षा सेवेला प्राधान्य देणाऱ्या महावितरण कंपनीने अकोला परिमंडळात वीज बिलाची वाढलेली थकबाकी बघता कर्मचाऱ्यांना थकबाकीदार ग्राहकांचा थेट वीज पुरवठा खंडित करण्याचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले आहेत.महावितरणच्या अकोला परिमंडळ  अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना ३० जून पर्यंत शंभर टक्के थकबाकी वसूल करण्याची ताकीद देण्यात आली आहे. कोरोना काळात वसुली ठप्प झाल्याने आर्थिक गणित कोलमडलेल्या महावितरणच्या वसुलीसाठी मुंबई कार्यालय, प्रादेशिक कार्यालयांकडून पाठपुरावा, आढावा घेण्यात येत आहे.  त्यामुळे थकबाकी वसुलीसाठी राबविण्यात येणाऱ्या मोहिमेतील सर्व कर्मचाऱ्यांसाठी वसुलीची जबाबदारी निश्चित करण्यात आली असून, परिमंडलात कार्यरत असलेल्या ३,००० हजार लाईनस्टाफला थकबाकी न भरणाऱ्या ग्राहकांवर कारवाईचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यामुळे थकबाकीदार ग्राहकांवर कारवाई होणार हे निश्चित असून, महावितरणची कटू कारवाई टाळण्यासाठी वीज ग्राहकांनी थकीत वीज बिलाचा भरणा करून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणतर्फे करण्यात येत आहे.

७ हजार ग्राहकांची जोडणी खंडित        अकोला परिमंडळांतर्गत अकोला, बुलडाणा आणि वाशिम जिल्ह्यातील ५ हजारापेक्षा जास्त थकबाकी असलेल्या विविध वर्गवारीतील ७ हजारापेक्षा जास्त थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. यामध्ये अकोला जिल्ह्यातील ३,००३ ग्राहकांचा समावेश असून, त्यांच्याकडे ५.६७ कोटीचे वीज देयके थकीत आहे. बुलडाणा जिल्ह्यातील ३,१७८ ग्राहकांनी २.७८ कोटी थकविल्याने त्यांंचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे, तर वाशिम जिल्ह्यातील १,१३७ ग्राहकांचा २.८० कोटीच्या थकबाकीसाठी वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. 

सुटीच्या दिवशीही वीज बिल भरणा केंद्र सुरू महावितरणची वसुली मोहीम जोरदार सुरू असल्याने या मोहिमेत थकबाकीदार वीज ग्राहकांना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे; परंतु वीज ही अत्यावशक सेवा असल्याने ग्राहकांची गैरसोय होऊ नये व ग्राहकांना कारवाई टाळण्यासाठी थकीत वीज बिलाचा भरणा करता यावा यासाठी महावितरणची वीज बिल भरणा केंद्रे सुट्टीच्या दिवशीही उघडी ठेवण्यात आली आहे. याशिवाय वीज ग्राहकांना महावितरणचे संकेतस्थळ व महावितरण मोबाईल ॲपव्दारे ऑनलाईन वीजबिल भरण्याची सोय उपलब्ध आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणwashimवाशिम