शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

तंटामुक्ती पुरस्काराची रक्कम हडपली

By admin | Updated: August 26, 2014 23:58 IST

माजी उपसरपंचाचा आरोप : सीईओंना निवेदन

मानोरा : मानोरा पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या ग्राम उमरी खुर्द येथील सरपंच व सचिव यांनी उपलब्ध असलेल्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती पुरस्काराची रक्कम व विविध योजनेच्या रकमेची संगनमत करून अपहार केल्याचा आरोपी उमरी खुर्द येथील माजी सरपंच श्रीराम चिल्या जाधव यांनी मुख्य कार्यपालन अधिकारी जि.प. वाशिम यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली असून, अपहार करणार्‍याविरुद्ध योग्य ती कायदेशीर कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. मुख्य कार्यपालन अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात जाधव यांनी असे म्हटले आहे की, ते उमरी खुर्द या ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच असून, गावाचा विकास व्हावा, अशी त्यांची तळमळ असल्याने ते सदैव ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेस आवर्जुन उपस्थित असतात. मागील झालेल्या सभेमध्ये सन २0१३-१४ मध्ये ग्रामपंचायत उमरी खुर्दला महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीला तीन लाख रुपयांचे बक्षीस मिळाले होते; पण सदर बक्षिसाच्या रकमेचे विकासाच्या दृष्टीने विनियोग न करता संगनमताने सचिव व सरपंच यांनी भ्रष्टाचार करून अपहार केल्याचा आरोप करून महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतून शतकोटी वृक्षलागवड करण्यात आल्याचे दाखवून आपली मजुरांच्या नावे रक्कम काढून अपहार केला असल्याचे निवेदनात म्हटले आहे. उमरी खुर्द येथील अजाब बाबुराव जाधव यांच्या गल्लीतील रस्ता पूर्ण केल्याचे दाखविले. प्रत्यक्षात तेथे कोणत्याच प्रकारचा रस्ता केला नाही. तेव्हा सदर जागेचे स्थळ निरीक्षण करून पाहणी करण्यात आली, असे निवेदनात म्हटले आहे. पुढे त्यांनी निवेदनात असे म्हटले आहे की, वसंतनगरजवळील रस्ता जेसीबी मशीनने पूर्ण करून खोट्या मजुरांच्या नावे पैसे काढून कमी पैशात रस्ता पूर्ण करून उपलब्ध रकमेचा अपहार केला आहे. एक महिन्यापूर्वी मी ग्रा.पं. संबंधी सन २0१३-१४ च्या काम व खर्चाबाबत विचारणा केली असता संबंधित सचिव यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन हिशोब दिला नाही. अशा पद्धतीचा आरोप जाधव यांनी केला असून, ग्रामपंचायतच्या रेकॉर्ड पाहणी तसेच हिशोबाची रितसर चौकशी करून अपहार व भ्रष्टाचार करणार्‍या सरपंच व सचिव यांच्यावर योग्य ती कायदेशीर कार्यवाही करावी, अशी मागणी केली आहे. निवेदनाच्या प्रती गटविकास अधिकारी पंचायत समिती मानोरा यांना पाठविण्यात आलेल्या आहेत. उमरी खुर्दप्रमाणे इतरही ग्रामपंचायतीची रेकॉर्ड तपासणी व केलेल्या कामाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी तालुक्यातील जनतेतून करण्यात येत आहे. दरम्यान, या संदर्भात मानोरा पंचायत समितीचे ज्येष्ठ विस्तार अधिकारी बी.ए. अवघण यांनी ग्रामपंचायतच्या विकासकामासंदर्भात तक्रार कार्यालयात प्राप्त झाली असून, चौकशी करून पुढील कार्यवाही करू अशी प्रतिक्रिया दिली आहे.