शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

टँकरचा प्रस्ताव लालफितशाहीत !

By admin | Updated: May 21, 2017 13:47 IST

पाणी टंचाईची तिव्रता वाढलेली असतानाही टँकरच्या प्रस्तावाला मान्यता मिळाली नाही.

राजूर : येथील पाणी टंचाईची तिव्रता वाढलेली असतानाही, अद्याप टँकरच्या प्रस्तावाला मान्यता मिळाली नाही. किरकोळ त्रूटी असल्याचे कारण समोर करून हा प्रस्ताव गत तीन महिन्यांपासून प्रशासन दरबारी पडून आहे. दरम्यान, टँकरद्वारे तातडीने राजूरा येथे पाणीपुरवठा करावा, अशी मागणी गावकऱ्यांनी मालेगाव तहसिलदारांकडे शनिवारी केली. गत काही वर्षांपासून राजूरा येथील तीव्र पाणीटंचाई लक्षात घेता मार्च महिन्यापासून टँकरने पाणीपुरवठा केला जातो. यावर्षी मे महिना संपत आला तरी टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला नाही. गावात जलस्त्रोत नसल्याने दूरवरून गावकऱ्यांना पाणी आणावे लागत आहे. रात्री-अपरात्री जागून पिण्याचे व वापराचे पाणी आणण्यसाठी लहान बालकांपासून ते आबालवृद्धांना कसरत करावी लागत आहे. मिळेल त्या ठिकाणावरून पाणी आणण्यासाठी गावकऱ्यांची पायपीट सुरू आहे. ग्रामपंचायत  प्रशासनाचेवतीने टँकरचा प्रस्ताव तहसीलकडे दाखल करण्यात आला. मात्र या प्रस्तावात त्रूटी असल्याचे कारण देत हा प्रस्ताव गत तीन महिन्यांपासून धुळ खात पडला आहे. यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते मनिष दत्तराव मोहळे, यशवंत हिवराळे, शिवा वामनराव खराटे यांनी मालेगावचे तहसिलदार राजेश वजीरे यांची २० मे रोजी भेट घेवून पाणी समस्या कथन केली. सोबतच गावाला तत्काळ टँकरव्दारा पाणीपुरवठा करण्याची मागणी केली. यावेळी तहसिलदार वजीरे यांनी उपस्थितांसमक्ष वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयाशी भ्रमणध्वनीव्दारे संपर्क साधून राजूरा येथील टँकरचा प्रस्तावाबाबत माहिती घेतली. येत्या सोमवार किंवा मंगळवारपर्यंत टँकरचा प्रश्न मार्गी  लावू, अशी ग्वाही वजीरे यांनी शिस्टमंडळाला दिली.