शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

अतिटंचाईग्रस्त खेर्डी गावात टँकर अद्याप पोहचलेच नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2019 15:23 IST

खेर्डी या गावातील सर्वच जलस्त्रोत एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून कोरडे पडले.

मालेगाव : तालुक्यातील खेर्डी या गावातील सर्वच जलस्त्रोत एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून कोरडे पडले. त्यामुळे प्रशासनाने गावाला टँकरने पाणीपुरवठा करावा, अशी मागणी होत असताना प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने टँकर अद्यापही गावात पोहोचले नाही. यामुळे पाण्यावाचून ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. नागपूर-औरंगाबाद महामार्गावरील पांगरीकुटे या गावापासून जवळच खेडी नावाचे गाव वसलेले आहे. गावात पाणीपुरवठ्याचा कुठलाही प्रभावी स्त्रोत उपलब्ध नाही. त्यामुळे दरवर्षी मार्च, एप्रिल महिन्यातच गावक-यांना तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागते. तशीच गंभीर परिस्थिती यंदाही उद्भवली आहे. त्यामुळे प्रशासनाने टँकरव्दारे गावाला पाणीपुरवठा करावा, अशी मागणी गावक-यांमधून होत आहे; परंतु टँकर अद्याप सुरू झालेले नाही. -----------------ऋषी महाराज संस्थानवरील भोजनावळींवरही परिणामखेर्डी येथे ऋषी महाराजांचे प्रसिद्ध देवस्थान आहे. या ठिकाणी मालेगाव तालुकाच नव्हे; तर नजिकच्या बुलडाणा व अकोला जिल्ह्यातून भाविक दर्शनासाठी येतात. यानिमित्त सोमवारी, गुरुवारी प्रसाद म्हणून भोजन दिले जाते. यंदा मात्र भीषण पाणीटंर्चामुळे या धार्मिक कार्यावरही परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. ................

ग्रामपंचायतीचे प्रयत्न ठरले निष्फळरेगाव-खेर्डी गट ग्रामपंचायतचे ग्रामसेवक विलास नवघरे, सरपंच वेणूबाई रमेश खंडारे, उपसरपंच ज्ञानेश्वर बापूराव आंधळे यांच्यासह अन्य ग्रामपंचायत सदस्यांनी खेर्डी गावाला तत्काळ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याच्या मागणीचा ठराव घेवून तो मालेगाव पंचायत समितीला सादर केला; मात्र ग्रामपंचायतीचे हे प्रयत्न निष्फळ ठरले असून टँकर अद्याप सुरू झालेले नाही. ....................

गावकरी आंदोलनाच्या पवित्र्यातखेर्डी गावाला विनाविलंब टँकरने पाणीपुरवठा सुरू करा; अन्यथा मालेगाव पंचायत समिती व तहसील कार्यालयावर घागर मोर्चा काढू, असा इशारा सरपंच वेणूबाई खंडारे, उपसरपंच आंधळे, कल्पना गायकवाड, सत्यभामा काळे, सिंधू सातपुते, रेखा घुगे, कान्होपात्रा आंधळे, सुनिता शेंडगे, कल्पना शेंडगे, काळुबाई कालापाड, लक्ष्मीबाई इंगोले, प्रतिभा गायकवाड, नेहा आंधळे, अरूणा थिटे, लक्ष्मी काळे, सुभद्रा आंधळे, कौशल्या भेंडेकर आदिंनी दिला आहे.