शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

बोगस खत, बियाणे विक्रेत्यांवर कठोर कारवाई करा!

By admin | Updated: April 20, 2016 02:08 IST

वाशिम येथे जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत कठोर कारवाई करण्याची पालकमंत्र्यांची सूचना.

वाशिम: यंदा मान्सूनचा अंदाज चांगला असल्याने खरीप हंगामात मोठय़ा प्रमाणात पेरणी होणार असून, शेतकर्‍यांना चांगल्या प्रतीचे बियाणे व खते पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देण्यात यावे. खत व बियाण्यात शेतकर्‍यांची फसगत करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य सभागृहात मंगळवारी आयोजित जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा, जलयुक्त शिवार अभियान व पाणीटंचाई आढावा बैठकीत ते बोलत होते.यावेळी आमदार राजेंद्र पाटणी, आमदार अमित झनक, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सोनाली जोगदंड, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, विभागीय कृषी सहसंचालक सिद्धोधन सरदार, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख, उ पविभागीय अधिकारी राजेश पारनाईक, डॉ. संदीपान सानप, डॉ. शरद जावळे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता नीलेश राठोड, सर्व तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी यांच्यासह सर्व विभागाचे प्रमुख उपस्थित होते.खरीप हंगामाचा आढावा घेताना डॉ. पाटील यांनी कृषी सेवा केंद्रांकडून शेतकर्‍यांची फसगत होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना कृषी विभागाला दिल्या. बियाणे किंवा खतांची विक्री करताना लिंकिंगच्या नावाखाली अनावश्यक बाबी शेतकर्‍यांच्या माथी मारल्या जातात. यंदाच्या खरीप हंगामात असे प्रकार टाळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व कृषी सेवा केंद्रांना बियाणे, खते व कीटकनाशकांचा उपलब्ध साठा, त्याची किंमत दर्शविणारा फलक दुकानाबाहेर लावण्याची सक्ती करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या. अनेक वेळा बियाणे खरेदी कर ताना शेतकर्‍यांची फसवणूक होते, त्यामुळे कृषी विभागाच्या अधिकार्‍यांनी जिल्ह्यातील सर्व बियाणे विक्री केंद्रांमध्ये जाऊन त्यांच्याकडे विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या बियाण्यांची तपासणी करावी. बियाणे, खते यांची साठेबाजी व काळाबाजार रोखण्यासाठी प्र त्येक तालुक्यात कृषी विभागामार्फत विशेष पथक स्थापन करण्याच्या सूचनाही पालकमंत्री डॉ. पाटील यांनी यावेळी दिल्या.