शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

घरगुती गॅसवर हॉटेलमध्ये तडका

By admin | Updated: October 29, 2014 01:23 IST

कारंजा तालुक्यात सर्रास वापर : महसूल अधिकार्‍यांनी लक्ष देण्याची मागणी.

कारंजा लाड (वाशिम): घरगुती वापरासाठी असलेले सिलिंडर ग्रामीण भागातील हॉटेल्स्, ढाबे येथे सर्रासपणे वापरले जात आहे. हॉटेल्स्, ढाब्यांच्या तुलनेत व्यावसायिक सिलिंडरधारकांची संख्या नगण्य असल्याची माहिती असूनही यावर महसूल व संबंधित यंत्रणेने काहीच कारवाई केली नसल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.आहार शिजविण्यासह इतर कामांसाठी सिलिंडर ही वस्तू अत्यावश्यक म्हणून गणली जाते. घरगुती वापराबरोबरच सिलिंडरचा व्यावसायिक क्षेत्रातही वापर होत असल्याने ह्यघरगुती आणि व्यावसायिकह्ण असे सिलिंडरचे दोन प्रकार पाडण्यात आले आहेत. घरगुती वापरासाठी असलेल्या सिलिंडरची किंमत ४५0 रुपयांच्या आसपास, तर व्यावसायिक सिलिंडरची किमत १५00 रुपयांच्या आसपास आहे. गॅसची टंचाई निर्माण होऊ नये म्हणून हॉटेल, धाबा व इतर व्यावसायिक क्षेत्रात घरगुती सिलिंडरचा वापर करण्यावर शासनाने बंदी आणली आहे. या आदेशाची पायमल्ली करणार्‍याविरुद्ध कठोर कारवाई करण्याचेही शासनाने सुचविले आहे; मात्र शहरासह ग्रामीण भागातील हॉटेल्स्, धाब्यामध्ये सर्रासपणे घरगुती सिलिंडरचाच वापर केला जात असल्याची धक्कादायक माहिती आहे. घरगुती व व्यावसासिक सिलिंडरधारकांची संख्या आणि शहर व ग्रामीण भागातील हॉटेल्स्ची संख्या यावर नजर टाकली तर घरगुती सिलिंडरचा कसा गैरवापर केला जातो हे दिसून येते.