शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वाइन फ्लू’ने अनसिंगच्या युवकाचा मृत्यू!

By admin | Updated: April 27, 2017 01:42 IST

वाशिम : तालुक्यातील अनसिंग येथील एका ३५ वर्षीय युवकाचा बुधवार,२६ एप्रिल रोजी दुपारी अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयामध्ये ‘स्वाइन फ्लू’ने मृत्यू झाला.

नागरिकांमध्ये दहशत : आरोग्य विभागाचे दुर्लक्षवाशिम : तालुक्यातील अनसिंग येथील एका ३५ वर्षीय युवकाचा बुधवार, २६ एप्रिल रोजी दुपारी अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयामध्ये ‘स्वाइन फ्लू’ने मृत्यू झाला. या घटनेने अनसिंग व परिसरात ‘स्वाइन फ्लू’ची दहशत निर्माण झाली आहे.सदर युवकास २२ एप्रिल रोजी अकोला येथील आयकॉन हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. तेथून त्याला सर्वोपचार रुग्णालयात हलविण्यात आले. बुधवारी दुपारी १२ वाजता त्याचे उपचारादरम्यान निधन झाले. सदर युवक हा विवाहित असून, त्याला सहा वर्षांचा मुलगा आहे. ते दोघे देखील ‘स्वाइन फ्लू’ सदृश आजाराने त्रस्त असून, त्यांच्यावर वाशिम येथील एका खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू असल्याची माहिती आहे. अनसिंग येथील कांता प्रदीप ठाकरे यांनाही अशाच प्रकारातील आजाराने ग्रासले होते; मात्र त्यांच्यावर अकोला येथील खासगी रुग्णालयामध्ये उपचार करण्यात आले असून, त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती सूत्रांनी दिली.दरम्यान, आरोग्य विभागाकडे आवश्यक औषधसाठा नसल्याने रुग्णांना विविध संकटांना सामोरे जावे लागत आहे. आता तरी आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अनसिंग येथील ग्रामीण रुग्णालयात आवश्यक औषध साठा उपलब्ध करुन द्यावा, ‘स्वाइन फ्लू’ सदृश रुग्णांवर उपचार करण्यासाठी स्वतंत्र कक्ष सुरु करावा, अशी मागणी जोर धरत आहे.रुग्णालयाचा दुजोरायाप्रकरणी सर्वोपचार रुग्णालय प्रशासनाकडे शहानिशा केली असता, सदर युवकाचा ‘स्वाइन फ्लू’नेच मृत्यू झाल्याच्या वृत्तास दुजोरा मिळाला.सदर आजार एच १, एन.१ विषाणूपासून उद्भवतो. या आजाराची लक्षणे ताप येणे, खोकला, हातपाय दुखणे अन श्वास घेण्यास त्रास होणे होय. अशी लक्षणे आढळल्यास ताबडतोब वैद्यकीय सल्ला घेऊन औषधोपचार करणे गरजेचे आहे. गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरल्यास योग्य.-डॉ. अनिल कावरखे, वैद्यकीय अधिकारी , जिसारु वाशिम