शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

प्रमुख पक्षांची स्वबळाची हाक!

By admin | Updated: October 22, 2016 02:30 IST

वाशिम जिल्ह्यातील नगर परिषद निवडणुकांच्या पृष्ठभूमीवर आघाड्या किंवा युतीबाबत अनिश्‍चितता असून इच्छुक उमेदवारही संभ्रमात आहे.

वाशिम, दि. २१- जिल्ह्यातील तीनही नगर परिषदेच्या निवडणुकीत अद्याप प्रमुख पक्षांची युती अथवा आघाडी झाली नसून, प्रत्येकाने स्वबळाची तयारी चालविली आहे. प्रमुख पक्षांची युती अथवा आघाडी होणार की नाही, याबाबत इच्छुक उमेदवारही संभ्रमात असल्याचे दिसून येते.जिल्ह्यातील वाशिम, कारंजा व मंगरुळपीर नगर परिषदेचा पाच वर्षांंंचा कार्यकाळ डिसेंबर २0१६ मध्ये संपणार असल्याने येत्या २७ नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर प्रत्येक प्रमुख पक्षाने युती अथवा आघाडीकडे लक्ष न देता स्वबळावर इच्छुक उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. गत विधानसभा निवडणुकीत प्रत्येक पक्षाच्या युती-आघाडीतील घटस्फोटामुळे राजकीय समीकरणं पार बदलून गेली आहेत.विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रत्येक प्रमुख राजकीय पक्ष स्वतंत्रपणे मैदानात उतरला होता. हाच धागा पकडून आता नगर परिषदेच्या निवडणुकीतही प्रमुख पक्ष स्वबळावर निवडणुकीची हाक देत असल्याने ह्यराजकारणह्ण चांगलेच तापले असल्याचे दिसून येते.गत पंच वार्षिकमध्ये वाशिम नगर परिषदेवर आमदार राजेंद्र पाटणीप्रणित जिल्हा विकास आघाडी व राकाँ युती, मंगरुळपीर नगर परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि कारंजा नगर परिषदेवर भाजपाचे नरेंद्र गोलेच्छाप्रणित आघाडीची सत्ता होती. दरम्यानच्या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेल्याने गतवेळची समीकरणे यावेळी पूर्णत: बदलली असल्याचे दिसून येते. बदललेली समीकरणे पाहता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, भारिप-बमसं व स्थानिक आघाड्यांसाठी नगर परिषदेची निवडणूक मोठी कसरत ठरणारी आहे. सर्वाधिक चुरस वाशिम नगर परिषद निवडणुकीत होण्याचा अंदाज वर्तविला जात असून, प्रमुख पक्षांनी इच्छुकांच्या चाचपणीचा सपाटा लावला आहे. वाशिम येथे नगराध्यक्ष पद खुल्या प्रवर्गासाठी आहे. येथे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा व शिवसेना या चार प्रमुख पक्षांनी अद्याप युती अथवा आघाडीसाठी मित्रपक्षांशी बोलणी झाली नसल्याची माहिती आहे. स्वत:ची राजकीय शक्ती दाखवून देण्याच्या नावाखाली प्रत्येक पक्षाने जातीय समीकरण व एक गठ्ठा मतदानावर डोळा ठेवल्याचे दिसून येते. तीनही ठिकाणी उमेदवारांची चाचपणी प्रत्येक पक्षाकडून सुरू असल्याने, अद्याप कोणत्याही पक्षाने नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर केला नाही. विरोधकांपेक्षा स्वकीयाकडूनच ऐनवेळेवर जास्त दगाबाजी नको म्हणून अंतर्गत गटबाजी व असंतुष्टांवर प्रत्येकजण बारीक नजर ठेवून आहे. जिल्ह्यातील राजकीय स्थितीचा विचार केल्यास, येथे प्रत्येक पक्षाला कमी-अधिक प्रमाणात गटबाजीचा डाग लागल्याचे दिसून येते. अंतर्गत गटबाजी शमविण्याबरोबरच असंतुष्टांना संतुष्ट करण्याची कसरत प्रमुख पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांना करावी लागणार आहे. प्रत्येक पक्ष स्वबळावर निवडणूक रिंगणात उतरला असल्याने चुरस निर्माण झाल्याचे दिसून येते. प्रत्येक पक्षाने स्वबळाची हाक दिल्याने इच्छुक उमेदवारही संभ्रमात असून, ऐनवेळी युती झाली, तर कुणाचे तिकीट कापले जाणार? या शक्यतेने इच्छुकांमध्ये तर्कवितर्क लढविले जात आहेत.