शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

पिण्याच्या पाण्याचा तुटवडा अन् वैद्यकांची कमतरता कायम

By admin | Updated: September 1, 2014 23:29 IST

दोन महिन्यांपासून शिबिरच नाही : वैद्यकीय अधीक्षकांचे पद रिक्तच

अनसिंग : ज्याच्या हाती संपूर्ण ग्रामीण रुग्णालयाचा कारभार असतो ते पदच रिक्त असल्याने स्थानिक ग्रामीण रुग्णालयात सुविधांचा पुरता बोजवारा उडाला आहे. गेल्या दोन महिण्यापासून या रुग्णालयात एकही कँप केवळ वैद्यकांच्या कमतरतेपायी घेतला गेला नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे. अनसिंगचे प्राथमिक आरोग्य केंद्र वारला येथे गेल्याने अनसिंगला ग्रामीण रुग्णालय कार्यान्वीत करण्यात आले. साहजिकच ग्रामीण रुग्णालय दिल्यामुळे आरोग्य सेवा अधिक चांगल्याप्रकारे मिळतील, अशी अपेक्षा होती. मात्र ग्रामीण रुग्णालयाच्या कार्यान्वीततेपासून या परिसरातील रुग्णांच्या अपेक्षांना पुरता तडा गेला असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. मुलभूत सुविधा तर सोडाच पिण्यासाठी पाणीदेखील उपलब्ध नाही. त्यामुळे हे ग्रामीण रुग्णालय की प्राथमिक आरोग्य केंद्र असा प्रश्न परिसरातील जनता उपस्थित करीत आहेत. ग्रामीण रुग्णालयाच्या कार्यान्वीततेपेक्षा प्राथमिक आरोग्य केंद्रच बरे होते, अशा प्रतिक्रिया आता जनता व्यक्त करीत आहे. अनसिंगच्या ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिक्षकांचे पद गेल्या तीन वर्षापासून रिक्त आहे. वैद्यकीय अधिकार्‍यांची चार पदे असतांना केवळ एकच वैद्यकीय अधिकारी कार्यरत असल्याने रुग्णसेवेचा ताण व सोयीसुविधांच्या अभावात सांभाळण्याची पाळी कार्यरत वैद्यकीय अधिकार्‍यावर दोन महिण्यांपासून आली आहे. या ठिकाणचा तात्पुरता चार्ज डॉ.आशिष मारकड यांच्याकडे देण्यात आला आहे. रुग्णालयात पिण्याचे पाणी उपलब्ध नाही. या ठिकाणी लावण्यात आलेले फिल्टर शोभेचे वास्तु बनले आहे. रुग्णांना पिण्यासाठी तथा वापरण्यासाठी पाणी आणण्याकरिता हॉटेल तथा विहीरींचा आधार घ्यावा लागत आहे. रुग्णांना आवश्यक असणारे पंखे बंद आहेत. शौचालय नादुरूस्त असून शौचासाठी रुग्णांना उघडयावर जावे लागते. एकीकडे शौचालयासाठी जागर अन दूसरीकडे शासनाच्याच रुग्णालयातील शौचालय बंद , ही विसंगती अनसिंग येथे पाहावयास मिळत आहे. शौचालय बांधलेले असून पाण्याअभावी त्याचा वापर बंद आहे. पावसाळ्य़ाच्या दिवसात पसरु शकणारी रोगराई पाहता अनसिंग व परिसरातील जनतेच्या आरोग्य सोयीसाठी अनसिंगच्या ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकांची नियुक्ती तातडीने करुन सुविधांची तातडीने पूर्तता करण्याची मागणी जनतेतून होत आहे.