शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

मालेगाव बाजार समितीच्या सचिवाचे निलंबन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 20:36 IST

मालेगाव - मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव प्रकाश कढणे यांना निलंबित करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधक आर.एन.कटके यांनी दिले आहेत. सदर आदेशाची प्रत शुकवारी बाजार समितीच्या सभापतींना मिळाली आहे.

ठळक मुद्देजिल्हा उपनिबंधक आर.एन.कटके यांनी दिले आदेश समितीचे सचिव प्रकाश कढणे निलंबित

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव - मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव प्रकाश कढणे यांना निलंबित करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधक आर.एन.कटके यांनी दिले आहेत. सदर आदेशाची प्रत शुकवारी बाजार समितीच्या सभापतींना मिळाली आहे.सभापतींना प्राप्त झालेल्या जिल्हा उपनिबंधकांच्या २७ सप्टेंबर २०१७ च्या कार्यवाहीच्या पत्रात म्हटले की, १० मे २०१७ ते ३१ मे २०१७ या दरम्यान तुरीची नोंदणी करण्याचे कामकाज शासन निर्देशानुसार बाजार समिती स्तरावर सुरू होते. ३१ मे २०१७ पर्यंत नोंद घेऊन सचिव, सहायक निबंधक तथा सहकारी संस्था यांच्या स्वाक्षरीने संबंधित कार्यालयात माहिती सादर करणे आवश्यक होते. तथापि, कोणतीही माहिती सादर केली नाही. ३१ मे २०१७ पर्यंत नोंदणी करण्यात आली होती, त्यापेक्षा अधिक तूर खरेदी केल्याचे स्पष्ट झाले यासंदर्भात कारणे दाखवा नोटीस बजावली होती. यावर प्रकाश कढणे यांनी असमाधानकारक उत्तर दिल्याने त्यांच्याविरूद्ध महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री अधिनियम १९६३ कलम ४० ई नुसार तत्काळ निलंबनाची कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधक आर.एन.कटके यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती मालेगावच्या सभापतींना दिले आहेत.

४५ वर्षीय इसमाची आत्महत्यामालेगाव - मालेगाव शहरातील रोहिदासपुरा येथील आश्रू उकांडा राठी (४५) यांनी सकाळच्या सुमारास शौचालयात गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत मृतकाचा मुलगा नारायण आश्रू राठी याने मालेगाव पोलिसांत फिर्याद दिली. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

सहा जनावरांची चोरीमालेगाव - तालुक्यातील पांगरी कुटे येथील गोठ्यातून चार म्हशी, दोन वगार अज्ञात चोरट्यांनी २८ सप्टेंबरच्या रात्रीदरम्यान लंपास केली. यासंदर्भात देवेंद्र दयालसा बांडे यांनी मालेगाव पोलिसांत फिर्याद दिली. या जनावरांची किंमत अंदाजे दोन लाख ४ हजार रुपये असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. घटनेचा पुढील तपास मालेगाव पोलीस करीत आहेत.