वाशिम, दि. ८- गेल्या दीड महिन्यांपासून सातत्याने गैरहजर राहणारे पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत विखे यांना सेवेतून निलंबित करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांनी बुधवार, ८ मार्च रोजी दिली. तथापि, या धडक कारवाईमुळे कामचुकार पोलीस अधिकारी व कर्मचार्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. वाशिम शहर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत विखे हे गेल्या दीड महिन्यांपासून सातत्याने गैरहजर आहेत. विखे यांच्याकडे महत्त्वाच्या गुन्ह्यांचा तपास असून, तो रखडला आहे. याशिवाय एका महत्त्वाच्या गुन्ह्यात आरोपीला जमानतीसाठी मदत केल्याचा ठपकादेखील त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या व इतर अनेक गंभीर चुका त्यांच्याकडून झाल्या. वरिष्ठ अधिकार्यांच्या सूचनेचेही पालन न केल्यामुळे पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांनी पोलीस उपनिरीक्षक विखे यांना निलंबित केले.
सतत गैरहजर राहणारा पीएसआय निलंबित
By admin | Updated: March 9, 2017 02:10 IST