शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

'स्वाधार' योजनेचा १२६७ विद्यार्थ्यांना आधार; ४२४ अर्ज झाले अपात्र

By दिनेश पठाडे | Updated: May 26, 2023 14:11 IST

समप्रमाणात दिले विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य, २०१६-१७ पासून योजना सुरु करण्यात आली असून पात्र विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँकखात्यात रक्कम जमा केले जाते.

वाशिम : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना अंतर्गत २०२२-२३ मध्ये नुतनीकरण आणि नवीन अर्ज मिळून १९३८ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी १२६७ विद्यार्थ्यांचे अर्ज पात्र ठरले असून त्यांना स्वाधार योजनेचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतीगृहात प्रवेश घेण्यास पात्र असलेल्या परंतु शासकीय वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या, शासकीय वसतीगृहात प्रवेश न घेतलेल्या तसेच निवास, भोजन व अन्य सुविधांअभावी पुढील शिक्षण घेऊ शकत नसलेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ दिला जातो. या घटकातील इयत्ता ११ वी, १२ वी व इयत्ता १२ वी नंतरच्या व्यावसायीक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये विविध स्तरावरील महाविद्यालयात, शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना मागासवर्गीय शासकीय वसतीगृहातील मुला-मुलींप्रमाणे भोजन, निवास शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता व इतर आवश्यक सुविधा स्वतः उपलब्ध करुन घेण्यासाठी अर्थसहाय्य दिले जात आहे.

२०१६-१७ पासून योजना सुरु करण्यात आली असून पात्र विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँकखात्यात रक्कम जमा केले जाते.  सन २०२२-२३ मध्ये प्राप्त एकूण १९७८ अर्जामधून सन २०२२-२३ मधील अनुसूचीत जाती व नवबौद्ध घटकातील शासकीय वसतीगृहासाठी अर्ज सादर केलेल्या परंतु, प्रवेश न मिळालेल्या ७२४ तसेच याच वर्षात  नुतनीकरणासाठी पात्र ५४३ विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेच्या प्राप्त  निधीमधून योजनेची रक्कम वर्ग करण्यात आली आहे.

४२४ अर्ज ठरले अपात्रस्वाधार योजनेच्या लाभासाठी काही निकष ठरविण्यात आले आहेत. पात्रतेनुसार विद्यार्थ्यांची निवड करुन त्यांना अर्थसहाय्य दिले जाते. २०२२-२३ मध्ये नुतनीकरण आणि नवीन अर्जांपैकी ४२४ अर्ज अपात्र ठरविण्यात आले आहेत. यामध्ये सर्वाधिक ३४७ अर्ज हे नवीन आहेत.

२८६ अर्ज त्रुटीतभारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेतर्गंत २०२२-२३ मध्ये  प्राप्त झालेल्या एकूण अर्जापैकी २८६ अर्ज त्रुटीत आहेत. ज्या विद्यार्थ्याचे अर्ज अद्याप त्रुटीमध्ये आहेत अशा विद्यार्थ्यांनी पुढील दहा दिवसांत त्रुटींची पुर्तता करुन घेणे आवश्यक आहे.