शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाचा पारा ४३ अंशावर; रस्त्यांवर शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 11:08 IST

२ वाजतानंतर वाशिमसह सहाही शहरांतील रस्त्यांवर सामसूम दिसून येते.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : सलग पाच दिवसांपासून कडक ऊन तापत असून, २३ मे रोजी तापमानाने ४३.५ अंश सेल्सिअसपेक्षा उच्चांक गाठला आहे. उन्हापासून आरोग्य जपा, असा सल्ला वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिला आहे.अंगाची काहिली करणाऱ्या उष्णतेची दाहकता दिवसागणिक कमालीची वाढत आहे. लॉकडाउन व संचारबंदीतून शिथिलता मिळाल्यानंतर, तापत्या ऊन्हामुळे दुपारी २ वाजतानंतर वाशिमसह सहाही शहरांतील रस्त्यांवर सामसूम दिसून येते. दरम्यान उष्माघाताशी दोन हात करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयांसह जिल्हा सामान्य रुग्णालय सज्ज ठेवण्यात आले. सलग पाच दिवसांपासून जिल्ह्यात सूर्य आग ओकत आहे. दिवसागणिक तापमानात वाढ होत असल्याची नोंद होत आहे. परिणामी जिल्हावासीयांच्या अंगाची काहीली होत आहे. आग ओकणाºया सूर्यामुळे जिल्हावासी होरपळत असल्याचे दिसून येते. 

 वाढत्या उन्हात फार काळ कष्टाची कामे टाळावी, कष्टाची काम सकाळी, संध्याकाळी अथवा तापमान कमी असेल तेव्हाच उरकावी उष्णता शोषून घेणारे कपडे (काळे, लाल अथवा भडक रंगाचे) टाळावे, जलसंजिवनीचा वापर करावा, भरपूर पाणी व लिंबु साखर पाणी प्यावे, असा सल्ला जिल्हा सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल कावरखे यांनी दिला. तीव्र उन्हाचा सर्वाधिक त्रास डोळ्याला तसेच त्वचेला जाणवतो. उन्हाळ्यात बाहेर पडताना त्वचा व डोळ्यांना त्रास होण्याची शक्यता गृहित धरून नागरिकांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. उन्हाची तीव्रता जास्त असल्याने त्वचा, डोळे कोरडे पडू शकतात, नागरिकांनी त्वचेची काळजी घ्यावी, असा सल्ला त्वचारोग तज्ज्ञ डॉ. विठ्ठल गोटे यांनी दिला.

टॅग्स :washimवाशिमTemperatureतापमान