शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

नादुरुस्त विद्युत रोहित्रांमुळे सुकल्या फळबागा

By admin | Updated: October 7, 2015 02:23 IST

चार महिन्यापांसून रोहित्रात बिघाड असल्याने शेतकरी त्रस्त.

वाशिम/शिरपूरजैन : जिल्ह्यात जवळपास २00 विद्युत रोहित्र नादुरुस्त असल्यामुळे संत्रा व पपईच्या फळबागा सुकल्या असून, शेतकर्‍यांना लाखो रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. दोन ते तीन महिन्यांपासून रोहित्र नादुरुस्त असून, शेतकर्‍यांनी आंदोलन केल्यामुळे केवळ ५७ रोहित्र नव्याने आले आहेत. परिणामी, उर्वरित विद्युत रोहित्रांचा प्रश्न ह्यजैसे थेह्ण असल्याने शेतकर्‍यांची झोप उडाली आहे. शिरपूर येथील जानगीर महाराज संस्थान परिसरातील फरशी नामक डी.बी. (रोहित्र) चार महिन्यांपूर्वी जळाली. ते अद्यापही दुरुस्त न केल्याने रोहित्रावर अवलंबून असलेल्या ३0 शेतकर्‍यांच्या शेतातील पिके सुकण्याच्या मार्गावर आहेत. शिरपूर येथील फरशी (डी.बी.) रोहित्र हे पावसाळा लागण्यापूर्वीच जून महिन्यामध्ये जळाले. तेव्हापासून या रोहित्रावर अवलंबून असलेल्या शेतकर्‍यांनी वेळोवेळी शिरपूर महावितरण कार्यालयाकडे यासंबंधी तक्रारी दिल्या आहेत; परंतु अद्यापही हे रोहित्र दुरुस्त करण्यात आले नाही. रोहित्राअभावी इब्राहिमखाँ बागवान यांची संत्राची झाडे सुकली आहेत, तर मुख्तारखाँ पठाण, विश्‍वनाथ भालेराव, ज्ञानेश्‍वर गावंडे, घिरके, मजहरखाँ अब्दल्लाखाँ यासह ३0 शेतकर्‍यांच्या शेतातील तूर व इतर पिके विजेअभावी सुकण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे शेतकरी पुरते त्रस्त झाले आहेत. संबंधितांकडे तक्रार करूनही महावितरण कंपनी लक्ष देत नसल्याने वीज कंपनीबाबत शेतकर्‍यांत रोष व्यक्त होत आहे. जिल्ह्यात जवळपास २00 रोहित्र बंद आहेत. विद्युत रोहित्र उपलब्ध करण्याबाबत वाशिमच्या वितरण कार्यालयाने वरिष्ठांकडे पाठपुरावा केला आहे. ५७ नवीन रोहित्र मिळाले आहेत.