शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी आत्महत्येचा तपास होणार आठवडाभरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 01:12 IST

शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना तत्काळ आर्थिक मदत मिळावी म्हणून शेतकरी आत्महत्या प्रकरणांचा तपास आठवडाभरात पोलिसांमार्फत करण्यात येणार आहे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांचे अवर सचिव आणि वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनची १६ सप्टेंबर रोजी बैठक झाली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.  महाराष्ट्रात नापिकी, कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी आत्महत्या करीत आहेत. अशा शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना या संदर्भात शासकीय मदत मिळण्यास मोठा विलंब लागतो. 

ठळक मुद्देशासनाचे निर्देश मुख्यमंत्र्यांचे अवर सचिव, शेती स्वावलंबन मिशनची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना तत्काळ आर्थिक मदत मिळावी म्हणून शेतकरी आत्महत्या प्रकरणांचा तपास आठवडाभरात पोलिसांमार्फत करण्यात येणार आहे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांचे अवर सचिव आणि वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनची १६ सप्टेंबर रोजी बैठक झाली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्रात नापिकी, कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी आत्महत्या करीत आहेत. अशा शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना या संदर्भात शासकीय मदत मिळण्यास मोठा विलंब लागतो. हा विलंब होऊ नये आणि शेतकरी आत्महत्येचा तपास लवकर होऊन संबंधित आत्महत्याग्रस्त कुटुंबांना त्वरित मदत देणे शक्य व्हावे, या दृष्टीने विचार करून निर्णय घेण्यासाठी कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन आणि मुख्यमंत्र्यांच्या अवर सचिवांची १६ सप्टेंबर रोजी बैठक पार पडली. या बैठकीनंतर शेतकरी आत्महत्या प्रकरणाचा तपास लवकर व्हावा, या दृष्टीने पोलीस विभागाला काही सूचना देण्यात आल्या आहेत. या अंतर्गत आत्महत्याग्रस्त कुटुंबाला तत्काळ मदत देण्यासाठी  शेतकरी आत्महत्येचे कारण तत्काळ शोधून, शेतकरी आत्महत्येचा तपास आठवडाभरात पूर्ण करावा लागणार आहे. यासाठी न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेला दोन दिवसांत अहवालही सादर करावा लागणार आहे. तसेच संबंधित पोलीस निरीक्षक किंवा सहायक पोलीस निरीक्षकांनी प्रत्यक्ष भेट देऊन शेतकरी आत्महत्या प्रकरणाच्या तपासाला योग्य दिशा देण्याची सूचनाही करण्यात आली आहे. शेतकरी आत्महत्येचा तपास एका आठवड्यात पूर्ण करण्यासाठी पोलीस अधीक्षक वा पोलीस आयुक्तांना दक्षता घ्यावी लागणार असून, या संदर्भात केलेल्या कार्यवाहीचा अहवाल विनाविलंब जिल्हाधिकार्‍यांकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवावा लागणार आहे. 

 पोलीस विभागाला शेतकरी आत्महत्या प्रकरणाचा तपास आठ दिवसांत पूर्ण करावा लागणार आहे. यासाठी संबंधित यंत्रणेलाही सहकार्य करावे लागेल. या निर्णयामुळे  शेतकरी आत्महत्याग्रस्त कु टुंबांना त्वरित मदत मिळण्यास मदत होणार आहे. - राहुल द्विवेदी, जिल्हाधिकारी, वाशिम