शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने युवकाची आत्महत्या!

By admin | Updated: March 12, 2017 01:56 IST

मृतक बाश्रीटाकळी तालुक्यातील; झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

वाशिम, दि. ११- विनयभंगाच्या गुन्ह्यामधून सुखरूप सुटला तरी तुला जीवाने मारून टाकू, अशा आशयाची धमकी दिल्यामुळे बाश्रीटाकळी तालुक्यातील एका युवकाने घाबरून जाऊन काटा रोड रेल्वे स्टेशन परिसरात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवार, ११ मार्चला सकाळी १0:३0 वाजता उघडकीस आली. चौहोगाव (ता. बाश्रीटाकळी जि. अकोला) येथील २८ वर्षीय युवक नीलेश गोवर्धन इंगळे याच्याविरुद्ध गावातीलच एका तरुणीने बाश्रीटाकळी पोलीस स्टेशनमध्ये विनयभंगाची तक्रार दिली होती. विनयभंगाची केस सध्या न्यायालयामध्ये सुरू आहे. ही केस सुरू असताना ९ मार्च रोजी युवतीचा भाऊ गजानन विश्‍वनाथ काळे, सुनील विश्‍वनाथ काळे, महादेव गंगाधर गालट व गंगाधर गालट यांनी नीलेश इंगळे याला म्हटले की, तू केसमध्ये सुटला तरी तुला आम्ही पाहून घेऊ, अशी धमकी दिली. या धमकीला घाबरून नीलेश इंगळे हा काटा रोड रेल्वे स्टेशन परिसरामध्ये शनिवारला सकाळी पोहोचला. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने आपल्या नातेवाइकाला भ्रमणध्वनीद्वारे कुठे व का आत्महत्या करीत आहो, याची कल्पना देऊन झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. या घटनेची वाशिम ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गोवर्धन इंगळे यांनी फिर्याद दाखल केली. या फिर्यादीहून पोलिसांनी गजानन काळे, सुनील काळे, महादेव गालट व गंगाधर गालट या चौघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास वाशिम ग्रामीण पोलीस करीत आहेत.