रिसोड: येथील व्यापारी युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ७ एप्रिलच्या रात्री १.३0 वाजताच्या दरम्यान उघडकीस आली. कल्पेश ताराचंद वर्मा असे मृताचे नाव आहे. कल्पेश वर्मा (वय ३४) हा रात्री उशिरापर्यंत घरी न आल्यामुळे घरातील व्यक्तींनी त्याचा शोध घेतला असता, राहत्या घराच्या गोडाउनमध्ये तो गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. मृत काही दिवसांपासून जागेच्या वादाने तणावग्रस्त असल्याचे सांगण्यात येते. या तणावातून त्याने आत्महत्या केल्याचे कळते. मृत कल्पेशजवळ ह्यसुसाईट नोटह्ण आढळून आली असून, त्यामध्ये एका नगरसेविकेच्या पतीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे नमूद असल्याची चर्चा आहे. ह्यसुसाईट नोटह्णबाबत उलटसुलट चर्चा असून, आत्महत्येस कोण कारणीभूत आहे? याचा तपास रिसोड पोलीस करीत आहे. त्याच्या मागे पत्नी, दोन वर्षांची मुलगी, आई, वडील, भाऊ, असा आप्त परिवार आहे. गोविंद वर्मा यांच्या फिर्यादीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास ठाणेदार रऊफ यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय हुंडेकर करीत आहेत.
युवकाची गळफास घेऊन आत्महत्या
By admin | Updated: April 9, 2016 01:31 IST