जऊळका रेल्वे (जि. वाशिम): जावयाच्या विरोधात तक्रार दिल्याच्या कारणावरून दगडाने व कुर्हाडीने मारून जखमी केल्याची घटना कवरदरी येथे २२ डिसेंबर रोजी घडली असून, या प्रकरणी जऊळका पोलिसांनी ४ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. कवरदरी येथील सुनील जाधव याने जऊळका पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली की, कवरदरी येथील रंजीत पवार, राजू पवार, पांडुरंग पवार, चंदा पवार, पांडुरंग पवार यांनी संगमत करून जावयाच्या विरोधात तक्रार दिली म्हणून मला व माझ्या भावाला दगडाने व कुर्हाडीने मारहाण जखमी केले. या तक्रारीवरून जऊळका पोलिसांनी रंजीत पवार, राजू पवार, पांडुरंग पवार, चंदाबाई पवार विरुद्ध कलम ३२४, ५0४, ५0६, ३४ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पीएसआय आरसेवार यांच्या मार्गदर्शनाखाली किन्हीराजा बिटचे जमादार ज्ञानेश्वर राठोड करीत आहेत.
तक्रार दिली म्हणून एकास मारहाण
By admin | Updated: December 23, 2015 02:30 IST