शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनी घेतली फटाके न फोडण्याची शपथ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 19:46 IST

जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा आसेगाव पोलीस स्टेशन येथे केंद्रस्तरीय शालेय स्पर्धेचा समारोप ११ आॅक्टोबर रोजी झाला. कार्यक्रमात विद्यार्थ्यांना दिवाळीदरम्यान फटाके न फोडण्याची शपथ देण्यात आली.

ठळक मुद्दे केंद्रस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेचा समारोपपर्यावरण स्वच्छतेबाबत मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कआसेगाव पो.स्टे. : जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा आसेगाव पोलीस स्टेशन येथे केंद्रस्तरीय शालेय स्पर्धेचा समारोप ११ आॅक्टोबर रोजी झाला. या स्पर्धेत शिवणी दलेलपूर शाळेच्या संघाने विजय मिळविला. दरम्यान, स्पर्धेच्या समारोपीय कार्यक्रमात विद्यार्थ्यांना दिवाळीदरम्यान फटाके न फोडण्याची शपथ देण्यात आली.केंद्र प्रमुख आर.एच. खंदारे यांच्या हस्ते या स्पर्धेचे उदघाटन १० आॅक्टोबर रोजी झाले होते. आसेगाव केंद्रातील १५ जिल्हा परिषद प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते. १० आॅक्टोबर रोजी प्राथमिक शाळा स्तरावरील कबड्डी, लंगडी या सांघिक स्पर्धा तर धावणे, लांब उड्डी, टप्पा शर्यत या वैयक्तिक क्रीडा स्पर्धा पार पडल्या. ११ आॅक्टोबर रोजी उच्च प्राथमिक शाळा स्तरावरील लंगडी, कबड्डी, खो-खो आदी सांघिक खेळ तर धावणे, लांब उडी, टप्पा शर्यत, गोळा फेक आदी वैयक्तिक क्रीडा स्पर्धा पार पडल्या. आसेगाव केंद्रांतर्गत दस्तापूर, चिंचखेड, मथुरा तांडा, रामगड, कुंभी, लही, वसंतवाडी, भडकुंभा, दाभडी,  पिंपळगाव, शिवनी, नांदगाव या १३ जिल्हा परिषद प्राथमिक व उच्च प्राथमिक मराठी शाळा तसेच आसेगाव जिल्हा परिषद मराठी व उर्दू प्राथमिक तसेच उच्च प्राथमिक शाळेचे विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते. शिवणी दलेलपूर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी खो-खो व कबड्डी स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला आहे. स्पर्धेच्या यशस्वितेसाठी केंद्रप्रमुख आर.एच. खंडारे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक जिल्हा परिषद मराठी शाळेचे मुख्याध्यापक जी.एस. शिनगारे, जिल्हा परिषद उर्दू शाळेचे मुख्याध्यापक मोहम्मद जावेद यांच्यासह शिक्षकांनी परिश्रम घेतले.दरम्यान स्पर्धेच्या समारोपीय कार्यक्रमात विद्यार्थ्यांना पर्यावरण स्वच्छतेचा संदेश देण्यात आला. दिवाळीदरम्यान फटाके फोडण्यामुळे प्रदुषण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रदुषण रोखण्यासाठी व विद्यार्थ्यांची सुरक्षितता म्हणून दिवाळीदरम्यान फटाके न फोडण्याची शपथ विद्यार्थ्यांना देण्यात आली.