शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी दिला वृक्ष संवर्धनाचा संदेश

By ram.deshpande | Updated: July 26, 2017 18:58 IST

मानोरा (वाशिम ): वृक्ष संवर्धन दिनानिमित्त येथील मातोश्री सुभद्राबाई पाटील महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आज २४ जुलै रोजी शहरातून वृक्षदिंडी काढण्यात आली. या वृक्ष दिंडीमधून विद्यार्थ्यांनी वृक्षसंवर्धनाचा संदेश दिला.

ठळक मुद्देशहरातील मुख्य मार्गावरून निघाली वृक्षदिंडीविद्यार्थ्यांनी दिला वृक्षसंवर्धनाचा संदेश

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा (वाशिम ): वृक्ष संवर्धन दिनानिमित्त येथील मातोश्री सुभद्राबाई पाटील महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आज २४ जुलै रोजी शहरातून वृक्षदिंडी काढण्यात आली. या वृक्ष दिंडीमधून विद्यार्थ्यांनी वृक्षसंवर्धनाचा संदेश दिला.सदर वृक्षदिंडी पंचायत समितीपासून शहरातील मुख्य मार्गावर निघाली. वृक्षदिंडीत विद्यार्थ्यांच्या हाती वृक्षाचे रोपे, फलक होते. झाडे जगवा, झाडे लावा, असे नारे विद्यार्थी देत होते. वृक्षसंवर्धन काळाची गरज आहे. असा संदेश देणारी फलके आकर्षीत करुन घेत होती. वृक्षदिंडीचा समारोप तहसील कार्यालयाच्या प्रांगणात झाला. समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार डॉ. सुनिल चव्हाण होते. प्राचार्य डॉ.एन. एस. ठाकरे, नायब तहसीलदार प्रकाश खाटीक, डॉ. इकबाल खान, प्रा. आर. के .ठाकरे, प्रा.एम.पी. ठाकरे, प्रा.पि. डी. राऊत, प्रा. डॉ.निळे, प्रा. पि. एन .कांबळे, प्रा. आर .टी .ब्राम्हण, प्रा. सुनिल काळे यांची उपस्थिती होती. यावेळी अध्यक्षीय भाषणातून तहसीलदार चव्हाण म्हणाले की, वृक्षसंवर्धनाचा व वृक्ष लागवडीचा उद्देश समाजाला समजला पाहिजे यासाठी महाविद्यालयाच्यावतीने वृक्षदिंडी काढली ती प्रशंसनीय आहे असे ते म्हणाले. याप्रसंगी प्राचार्य ठाकरे यांनी म्हटले की, विद्यार्थ्यांनी प्रत्येकी १० रोपे तयार करुन ती लावावी आणि त्याचे संगोपन करण्याचा ध्यास घेतला आहे. यावर्षी महाविद्यालयीन विद्यार्थी किमान एक हजार झाडे लावतील तसेच स्वच्छता अभियानांतर्गत कार्य सुरु आहे. शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांना समाज कार्याची गोडी निर्माण व्हावी हा उद्देश आहे. प्रास्ताविक भाषण प्रा.हेमंत चव्हाण यांनी केले ते म्हणाले की, विद्यार्थ्यांनी वृक्षसंवर्धनाचा जो वसा घेतला तो अभिनंदनीय आहे. कार्यक्रमाचे संचालन प्रा.पंकज राऊत यांनी केले. आभार प्रा.एम.पी.ठाकरे यांनी केले. वृक्षदिंडीत शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते.