शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
2
भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
3
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
4
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
5
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
6
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
7
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
8
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
9
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
10
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
11
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
12
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
13
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
14
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
15
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
16
सामान्य माणसाला न्याय हे बळकट लोकशाहीचे प्रतिक - सरन्यायाधीश भूषण गवई
17
जगप्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन राणावत यांचे निधन; ९०व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
18
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
19
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
20
२०३० पर्यंत मुंबई रेबिजमुक्त करणार; पालिकेचा संकल्प, जनजागृती करणार

समृद्धीच्या कामासाठी भर पावसाळ्यात धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:53 IST

वाशिम जिल्ह्यात पॅकेज ४ आणि पॅकेज ५, असे दोन टप्प्यांत समृद्धी महामार्गाचे काम केले जात आहे. यात पॅकेज ५ ...

वाशिम जिल्ह्यात पॅकेज ४ आणि पॅकेज ५, असे दोन टप्प्यांत समृद्धी महामार्गाचे काम केले जात आहे. यात पॅकेज ५ मध्ये ४२.८७७ किमी अंतरात उड्डाण पूल, लघू पूल, आरओबी, व्हीओपी, व्हीयूपी, एलव्हीयूपी, कप आणि पीयूपी, डब्ल्यूओपी, पीओपी, बॉक्स रेल्वे आणि नवनिर्मिती मिळून ८३ रचना आहेत. त्यापैक ३२३ रचना पूर्ण झाल्या, तर ४३ रचनांची कामे प्रगतिपथावर आहेत, तर पॅकेज ४ मध्ये ५४.३५६ किमी अंतरात १२६ रचना असून, त्यापैकी ७९ पूर्ण झाल्या, तर ३८ रचनांची कामे प्रगतिपथावर आहेत. जवळपास ७२१ किमी अंतराच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग असे नामकरण करण्यात आले आहे. या प्रकल्पाचे काम पूर्ण करून त्याचे लोकार्पण करण्यासाठी राज्यशासनाची धडपड आहे. गत १ मे रोजीच या महामार्गातील काही भागाचे लोकार्पण करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती, परंतु तांत्रिक अडचणीमुळे ते होऊ शकले नाही. आता वाशिम जिल्ह्यात दोनद बु. ते जनुना खु. या दरम्यान प्रलंबित असलेली कामे पूर्ण करण्यासाठी कंत्राटदार आणि राज्य रस्ते विकास महामंडळाची मोठी कसरत सुरू आहे. त्यामुळे भर पावसाळ्यातही उड्डालपुलासह विविध कामे केली जात असल्याचे पाहायला मिळत आहे.

--------------

पावसाचा कामात खोडा

समृद्धी महामार्गाचे काम वेगात करून, त्याचे लोकार्पण करण्यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळ आणि कंत्राटदार कंपन्यांची धडपड सुरू आहे. त्यामुळेच पावसातही या मार्गाचे काम केले जात आहे. काही भागांत हे काम सुरळीत होत असले, तरी गत चार दिवसांत आलेल्या पावसामुळे या कामांत खोडाही आला आहे. तथापि, पावसाची उघाड मिळताच, काम सुरू करून शक्य तेवढ्या लवकर ते पूर्ण करण्याचा प्रयत्न प्रशासन आणि कंत्राटदारांकडून होत आहे.

-------------

===Photopath===

150621\15wsm_1_15062021_35.jpg

===Caption===

समृद्धीच्या कामासाठी भर पावसाळ्यात धडपड