शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
2
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
3
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
4
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
5
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
6
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
7
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
8
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
9
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
10
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
11
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
12
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
13
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
14
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
15
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
16
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
17
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
18
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
19
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
20
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...

भरपावसाळ्यात समृद्धीच्या कामासाठी धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:53 IST

वाशिम जिल्ह्यात पॅकेज ४ आणि पॅकेज ५, असे दोन टप्प्यांत समृद्धी महामार्गाचे काम केले जात आहे. यात पॅकेज ५ ...

वाशिम जिल्ह्यात पॅकेज ४ आणि पॅकेज ५, असे दोन टप्प्यांत समृद्धी महामार्गाचे काम केले जात आहे. यात पॅकेज ५ मध्ये ४२.८७७ किमी अंतरात उड्डाण पूल, लघु पूल, आरओबी, व्हीओपी, व्हीयूपी, एलव्हीयूपी, कप आणि पीयूपी, डब्लूओपी, पीओपी, बॉक्स रेल्वे आणि नवनिर्मिती मिळून ८३ रचना आहेत. त्यापैकी ३२३ रचना पूर्ण झाल्या, तर ४३ रचनांची कामे प्रगतिपथावर आहेत, तर पॅकेज ४ मध्ये ५४.३५६ किमी अंतरात १२६ रचना असून, त्यापैकी ७९ पूर्ण झाल्या, तर ३८ रचनांची कामे प्रगतिपथावर आहेत. जवळपास ७२१ किमी अंतराच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग असे नामकरण करण्यात आले आहे. या प्रकल्पाचे काम पूर्ण करून त्याचे लोकार्पण करण्यासाठी राज्य शासनाची धडपड आहे. गत १ मे रोजीच या महामार्गातील काही भागांचे लोकार्पण करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. परंतु, तांत्रिक अडचणीमुळे ते होऊ शकले नाही. आता वाशिम जिल्ह्यात दोनद बु. ते जनुना खु. या दरम्यान प्रलंबित असलेली कामे पूर्ण करण्यासाठी कंत्राटदार आणि राज्य रस्ते विकास महामंडळाची मोठी कसरत सुरू आहे. त्यामुळे भरपावसाळ्यातही उड्डाण पुलासह विविध कामे केली जात असल्याचे पाहायला मिळत आहे.

--------------

पावसाचा कामात खोडा

समृद्धी महामार्गाचे काम वेगात करून त्याचे लोकार्पण करण्यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळ आणि कंत्राटदार कंपन्यांची धडपड सुरू आहे. त्यामुळेच पावसातही या मार्गाचे काम केले जात आहे. काही भागांत हे काम सुरळीत होत असले तरी, गत चार दिवसांत आलेल्या पावसामुळे या कामांत खोडाही आला आहे. तथापि, पावसाची उघडीप मिळताच काम सुरू करून शक्य तेवढ्या लवकर ते पूर्ण करण्याचा प्रयत्न प्रशासन आणि कंत्राटदारांकडून होत आहे.

--------------

===Photopath===

140621\14wsm_1_14062021_35.jpg

===Caption===

भर पावसाळ्यात समृद्धीच्या कामासाठी धडपड