शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

वडिलांच्या स्वप्नपूर्तीसाठीच संघर्ष यात्रा

By admin | Updated: August 31, 2014 01:52 IST

मालेगाव येथे पंकजा मुंडे यांची जाहीर सभा.

मालेगाव : कष्टकरी आणि बहूजन समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपले वडील स्व. गोपिनाथराव मुंडे यांनी आपले आयुष्य खर्ची घातले. आपल्या वडिलांना शेवटच्या श्‍वासापर्यंत संघर्ष करावा लागला. त्याच मार्गावरुन मार्गक्रमण करत आपल्या वडिलांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडविण्यासाठी, स्वाभिमानी कार्यकर्त्याची फौज जोडण्यासाठीच आपण संघर्षयात्रा काढल्याचे प्रतिपादन भारतिय जनता युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा आमदार पंकजा मुंडे/पालवे यांनी केले. त्या मालेगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात आयोजीत जाहीर सभेला संबोधीत करीत होत्या.सभेला खासदार संजय धोत्रे, आमदार रणजित पाटील, तेजराव पाटील थोरात, आकाश फुंडकर, सुरजसिंह ठाकूर, विजयराव जाधव, श्याम बढे, डॉ.विवेक माने, सुरेश लूंगे यांची उपस्थिती होती. पुढे बोलतांना त्या म्हणाल्या की,आपल्या वडिलांच्या जाण्याचे दु:ख आमच्या परिवारापेक्षाही जास्त महाराष्ट्रातील जनतेला झाले आहे. महाराष्ट्रात शोषित उपेक्षीत कष्टकरी जनतेची सत्ता स्थापन करावयाचे स्वप्न आपल्या वडिलांनी पाहिले होते. त्या स्वप्नाची पुर्तता करण्यासाठीच आपण संघर्ष यात्रेच्या निमीत्ताने बाहेर पडली आहे. मॉ जिजाऊंचे शौर्य, सावित्रीबाईचे धैर्य अन् अहिल्यादेवी होळकरांचे औदार्य जनसामान्यांचे आशिर्वाद आपल्या पाठिशी असल्याचे भावोत्कट उद्गार काढत आमदार पंकजा मुंडेंनी आपल्या वडिलांनी शिवनेरी ते शिवतीर्थ अशी यात्रा काढून राज्यात परिवर्तन घडविले होते. त्याचीच पुनारावृत्ती आपल्याही संघर्षयात्रेला मिळणारा प्रतिसाद पाहता यावेळीही घडणार असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. या जाहीर सभेला भाजपाच्या तमाम शाखांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह जनसामान्यांची हजारोंच्या संख्येने उपस्थिती होती.सभेचे संचालन व आभार प्रदर्शन मोहन बळी यांनी केले.