कारंजा शहरात झपाट्याने काेराेना पाॅझिटिव्ह आढळून येत असल्याने पाेलीस प्रशासन व नगर परिषद प्रशासनाने बैठक घेऊन संयुक्त उपक्रम राबविण्यास सुरू केेले आहेत. शहरातील अनेक दुकानांमध्ये गर्दी आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाईसह व्यापाऱ्यांची काेराेना चाचणी केली जात आहे. काेराेना चाचणी न करुन घेणाऱ्या दुकानदारांना २२ मार्चनंतर दुकाने उघडण्यास परवानगी राहणार नाही. याकरिता व्यापाऱ्यांनी ताबडताेब काेराेना चाचणी करून त्याचा अहवाल आपल्या प्रतिष्ठानमध्ये लावण्याचे आवाहन मुख्याधिकारी दादाराव डाेल्हारकर यांनी केले आहे. ज्या दुकानदारांकडे हे प्रमाणपत्र राहणार नाही, त्याच्यावर आपत्ती व्यवस्थापनानुसार कारवाई केली जाणार असून, यामध्ये काेणाचीही गय केली जाणार नाही, असे नगर परिषद प्रशासनाने कळविले आहे.
................
काेराेना नियमांचे शहरवासीयांनी पालन करावे तसेच व्यापाऱ्यांनी काेराेना चाचणी करून आपले व आपल्या येथे येणाऱ्या ग्राहकांची सुरक्षितता बाळगावी. तसेच काेराेना नियमांचे काटेकाेर पालन करून प्रशासनास सहकार्य करावे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची हयगय न करता त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
- दादाराव डाेल्हाकर, मुख्याधिकारी, नगर परिषद, कारंजा