शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांनी खरपूस समाचार घेतला; निलेश लंकेंनी वेगळाच आरोप करत वादाची दिशा बदलली!
2
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
3
मोठी बातमी: DC ची अडचण वाढली, रिषभ पंतवर एका सामन्याची बंदी अन् ३० लाखांचा दंड
4
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
5
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
6
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
7
लोकसभेच्या निकालानंतर संजय राऊत, उद्धव ठाकरे यांना अज्ञातवासात जावं लागेल, चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला
8
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
9
"सत्तेचा गैरवापर करणे ही पंतप्रधान मोदींची खासियत"; शरद पवार यांचा शिरूरमधून हल्लाबोल
10
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
11
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
12
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
13
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
14
POK मध्ये युद्धजन्य परिस्थिती; पाकिस्तानच्या दादागिरीविरोधात काश्मिरी जनता रस्त्यावर
15
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस
16
'आता KKRला सोडून जाऊ नको' म्हणत चाहत्याला फुटलं रडू, प्रेम पाहून गौतम गंभीरही झाला नि:शब्द (video)
17
भारीच! 18 तास काम केल्यावर 1000 रुपये मिळायचे; आता फुलांच्या शेतीतून झाला करोडपती
18
Fact Check : "मी तुम्हाला बेरोजगार करेन..."; योगी आदित्यनाथ यांच्या Video मागचं जाणून घ्या, 'सत्य'
19
मसाल्यांमधील ETO केमिकल्सवर सरकार अंकुश लावण्याच्या तयारीत, निर्यातदारांना करावं लागणार 'हे' काम

वाशिम शहरातील अरुंद रस्त्यांवर जडवाहनांचे अतिक्रमण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2017 10:23 PM

वाशिम शहरातील अंतर्गत वाहतूकीचा पुरता बट्टयाबोळ उडाला असून, रहदारीच्या अरूंद रस्त्यांवर जडवाहनांकडून एकप्रकारे अतिक्रमण करणे सुरू असल्याचे दिसून येत आहे. रविवार या बाजारच्या दिवशी तर हा प्रश्न अधिकच बिकट होतो. जडवाहनांना शहरात प्रवेशबंदीसाठी करण्याची मागणी जोर धरत आहे. 

ठळक मुद्देकुठलेचा निर्बंध नसल्याने समस्या अधिक बिकटजडवाहनांना शहरात प्रवेशबंदी करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या वाशिम शहरातील दैनंदिन वाहतूकीचा पुरता बट्टयाबोळ उडत असून रहदारीच्या अरूंद रस्त्यांवर जडवाहनांकडून एकप्रकारे अतिक्रमण करणे सुरू असल्याचे दिसून येत आहे. रविवार या बाजारच्या दिवशी तर हा प्रश्न अधिकच बिकट होतो. तथापि, शहर वाहतूक विभाग आणि नगर परिषद प्रशासनाने संयुक्तरित्या मोहिम राबवून गर्दीच्या वेळा लक्षात घेता, जडवाहनांना शहरात प्रवेशबंदीसाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी जोर धरत आहे. वाशिम शहरात रविवार हा बाजारचा दिवस आहे. वास्तविक पाहता आठवडी बाजाराकरिता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात जागा देण्यात आलेली आहे. मात्र, बहुतांश भाजीविक्रेते गेल्या अनेक वर्षांपासून शहराचा आत्मा समजल्या जाणा-या पाटणी चौक ते शिवाजी चौकादरम्यानच्या रस्त्यावरच बाजार भरवितात. या रस्त्यावरील दुभाजकही भाजीविक्रेत्यांनी मोकळा सोडलेला नाही. विशेष गंभीर बाब म्हणजे फळविक्रेत्यांच्या हातगाड्या रस्त्यावरच उभ्या राहत असल्याने वाहतूक वारंवार विस्कळित होत आहे. एवढी गंभीर स्थिती असताना जडवाहनांवरही कुठलेच निर्बंध नसल्याने समस्येत अधिकच भर पडली आहे. ट्रक, ट्रॅक्टर अथवा यासारखेच एखादे मोठे वाहन गर्दीतून वाट काढत असताना तासन्तास छोटी वाहने अडकून राहतात. एकूणच या सर्व समस्यांवर प्रभावी तोडगा काढण्याकरिता शहरांतर्गत रस्त्यांवर जडवाहनांना प्रवेश नाकारणे अत्यंत गरजेचे ठरत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष पुरवावे, अशी मागणी होत आहे.  

टॅग्स :Marketबाजार