कारंजालाड: शहरातील पथदिवे अनेक दिवसांपासून बंद आहेत. याकडे नगर परिषद प्रशासनाचे दुर्लक्ष असल्यामुळे नागरिकांना मोठय़ा अडचणींचा सामना करावा लागत आहे. कारंजा नगर परिषदेकडून शहरातील विविध मार्गावर दुतर्फा पथदिवे लावण्यात आले आहेत. रात्रीच्या वेळी नागरिकांना अंधारात चाचपडत जावे लागू नये, असाच त्या मागचा उद्देश; परंतु गत काही दिवसांपासून शहरातील काही भागातील पथदिवे बंद आहेत. यामध्ये बसस्थानक ते आंबेडकर चौकदरम्यानचा मार्ग, तसेच गवळीपुरा परिसराती काही पथदिवे अनेक दिवसांपासून बंद असल्यामुळे परिसरात काळोख असतो. या अंधाराचा फायदा चोरटे घेण्याची शक्यता आहे. त्याशिवाय रात्रीच्या वेळी नागरिकांनाही विविध अडचणींचा सामना त्यामुळे करावा लागत आहे. शहरातील इतरही भागातील काही पथदिवेसुद्धा क ाही दिवसांपासून बंद आहेत. नगर परिषदेने याकडे लक्ष देऊन शहरातील बंद असलेले पथदिवे त्वरीत सुरू करावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
कारंजा शहरातील पथदिवे बंद
By admin | Updated: October 23, 2014 00:50 IST