शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणचा अजब कारभार; जाेडणीपूर्विच शेतकऱ्याला देयक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:48 IST

कामरगाव : विद्युत जोडणीपूर्वीच महावितरणने एका शेतकऱ्याला १६ हजार ९२० रुपयांचे वीजबिल दिल्याचा प्रकार कामरगावात उघडकीस आला. त्यामुळे ...

कामरगाव : विद्युत जोडणीपूर्वीच महावितरणने एका शेतकऱ्याला १६ हजार ९२० रुपयांचे वीजबिल दिल्याचा प्रकार कामरगावात उघडकीस आला. त्यामुळे पुन्हा एकदा महावितरणचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे. तर महावितरणने वीजजोडणी देण्यापूर्वी वीजबिल दिल्याने संबंधित शेतकरी चक्रावून गेला.

कामरगाव येथील शेतकरी नामदेवराव टांगले यांनी आपल्या गट नं. ४६४ मधील बोअरवर कृषी विद्युत पुरवठ्यासाठी महावितरणकडे अर्ज केला. त्यानंतर कारंजा येथील कार्यालयाच्या सांगण्यानुसार सन २०१७ मध्ये ६ हजार १०० रुपयांचा भरणाही केला. तरीही तेव्हापासून ते आजपर्यंत त्यांना वीजजोडणी देण्यात आली नाही. याउलट वीजबिल मात्र देण्यात आले. त्यांनी आपल्या शेतात संत्रा पिकाची लागवड केली असून, महावितरणने वीजपुरवठा न केल्याने त्यांच्या संत्रा बागेतील अनेक झाडे सुकली आहेत. वीजजोडणीसाठी संबंधित शेतकऱ्याने कधी कामरगाव तर कधी कारंजा कार्यालयात येरझरा मारल्या. परंतु प्रत्येकवेळी संबंधित अधिकाऱ्यांकडून त्यांना वेगवेगळी कारणे देऊन वेळ मारून नेण्यात आली. वीजजोडणीसाठी अर्ज सादर केल्याची सत्यप्रत संबंधित कार्यालयाने दिली नसल्याचे शेतकरी महादेव टांगले यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता महावितरणने वीजजोडणीपूर्वीच वीजबिल दिल्याने नेमकी दाद कुणाकडे मागायची, असा प्रश्न संबंधित शेतकऱ्याला पडला आहे.