शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

महसूल कर्मचार्‍यांचे  काम बंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 01:54 IST

वाशिम: विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महसूल कर्मचारी संघटनेने १0 ऑक्टोबरपासून राज्यभरात काम बंद आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनात वाशिम जिल्हय़ातील सर्व महसूल कर्मचारी व पदोन्नत नायब तहसीलदार सहभागी झाले आहेत, असा दावा महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विशाल डुकरे यांनी केला.

ठळक मुद्देविविध मागण्या प्रलंबित महसूलविषयक कामकाज ठप्प!

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महसूल कर्मचारी संघटनेने १0 ऑक्टोबरपासून राज्यभरात काम बंद आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनात वाशिम जिल्हय़ातील सर्व महसूल कर्मचारी व पदोन्नत नायब तहसीलदार सहभागी झाले आहेत, असा दावा महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विशाल डुकरे यांनी केला.पुरवठा विभागातील पुरवठा निरीक्षक पद सरळ सेवेने भरल्यास महसूल विभागातील  अव्वल कारकून दर्जाचे कर्मचार्‍यावर अन्याय होणार असून, अनेक अव्वल कारकून संवर्गातील कर्मचारी यांना पदावनत व्हावे लागणार आहे. त्यामुळे पुरवठा विभागाचे परिपत्रकान्वये दिलेल्या पदभरतीच्या सूचनेला स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य महसुल कर्मचारी संघटनेने शासनाकडे यापूर्वी निवेदनाद्वारे केली होती; मात्र या मागणीवर कोणताच विचार न झाल्याने ३ ऑक्टोबरपासून  पुरवठा विभागाचे कर्मचारी कामबंद आंदोलनावर गेले आहेत. यामध्ये वाशिम जिल्हय़ातील कर्मचार्‍यांचादेखील सहभाग आहे. महसूल कर्मचार्‍यांच्या प्रलंबित मागण्यांकडेही शासनाचे दुर्लक्ष होत असल्याने महसूल कर्मचार्‍यांनी १0 ऑक्टोबरपासून काम बंद आंदोलन पुकारले आहे. महसूल कर्मचार्‍यांच्या प्रलंबित मागण्यांच्या अनुषंगाने सन २0१२ ते २0१५ या चार वर्षात राज्यात विविध टप्प्यात आंदोलन करण्यात आले होते. सन २0१३ व २0१४ मध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री, तत्कालीन महसूल मंत्री, अपर मुख्य सचिव व वित्त विभागाच्या अधिकार्‍यांशी महसूल कर्मचारी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी चर्चा केली होती. प्रलंबित मागण्यांपैकी काही मागण्या मान्य करून लवकरच शासन निर्णय जारी केला जाईल, असे आश्‍वासन दिले होते. या आश्‍वासनानुसार त्यावेळी आंदोलन स्थगित करण्यात आले होते, असा दावा महसूल कर्मचारी संघटनेने केला. या आश्‍वासनाला तीन वर्षे झाले; मात्र अद्यापही कार्यवाही नसल्याने महसूल कर्मचार्‍यांमधून असंतोष व्यक्त होत आहे. या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी १0 ऑक्टोबरपासून बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले असून, वाशिम जिल्हय़ातील महसूल कर्मचारी, पदोन्नत नायब तहसीलदार या आंदोलनात सहभागी झाले आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासह तहसील कार्यालयातील महसूलविषयक कामकाज ठप्प झाले.

तहसीलस्तरावर कामांचा खोळंबापुरवठा विभागासह तहसील कार्यालयाचे सर्व कर्मचारी या आंदोलनात सहभागी आहेत. परिणामी, वाशिम, रिसोड, मालेगाव, कारंजा, मंगरूळपीर व मानोरा येथील तहसील कार्यालयात मंगळवारी शुकशुकाट दिसून आला. कर्मचार्‍यांची लेखणी बंद असल्यानेकोणतेही कामकाज होऊ शकले नाही. याचा फटका ग्रामीण भागातून कामानिमित्त आलेल्या सर्वसामान्य जनतेला बसला.

प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यभरातील महसूल कर्मचारी कामबंद आंदोलनावर आहेत. वाशिम जिल्हय़ातील सर्व महसूल कर्मचारी व पदोन्नत नायब तहसीलदार या आंदोलनात सहभागी आहेत. सर्व मागण्या मंजूर केल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही. राज्य शासन वेळोवेळी केवळ आश्‍वासन देऊन संपाची सांगता करते. प्रत्यक्षात आश्‍वासनाची पूर्तता अद्यापही केली नाही. आता लेखी स्वरूपात दिल्यानंतरच संप मागे घेतला जाईल.        - विशाल डुकरेजिल्हाध्यक्ष, महसूल कर्मचारी संघटना, वाशिम.