शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

विनापरवाना पेट्रोल विक्रीची दुकानदारी बंद

By admin | Updated: May 12, 2017 17:16 IST

अनेकांनी खुद्द पेट्रोल विक्री बंद केल्याचे दिसून आले.

वाशिम : अत्यंत ज्वलनशिल द्रव पदार्थांमध्ये मोडणारा घटक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पेट्रोलची दिवसाढवळ्या दुकानदारी थाटून जिल्ह्यातील ४२ गावांमध्ये अवैधरित्या पेट्रोलविक्रीचा  प्रकार राजरोसपणे सुरू असल्याचे  ह्यस्टिंग आॅपरेशनह्णलोकमतने १२ मे रोजीच्या अंकात प्रकाशित केले होते. या वृत्ताची धास्ती घेत कारवाईच्या बडगा आपल्यावर उगारल्या जावू नये  म्हणून अनेकांनी खुद्द पेट्रोल विक्री बंद केल्याचे दिसून आले.जिल्ह्यातील वाशिम तालुक्यात तोंडगाव, वारा जहाँगीर, कळंबा महाली, कोंडाळा महाली, तांदळी शेवई, पार्डी टकमोर, काजळांबा, रिसोड तालुक्यातील केनवड, वाकद, लोणी, मोप, भर, मांगूळझनक, केशवनगर, चिखली, महागाव, आसेगावपेन, मानोरा तालुक्यातील पोहरादेवी, शेंदूरजना आढाव, फुलउमरी, वाईगौळ, हातना, कुपटा, इंझोरी, मानोरा, मालेगाव तालुक्यातील मेडशी, करंजी, जऊळका रेल्वे, डोंगरकिन्ही, कारंजा तालुक्यातील कामरगाव, उंबर्डाबाजार, धनज बु., लोहगाव, दोनद, खेर्डा बु., खेर्डा कारंजा यासह मंगरूळपीर तालुक्यातील कुंभी, वनोजा, तऱ्हाळा, शेलुबाजार, आसेगाव (पो.स्टे.) या गावांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून पानटपरी, हॉटेल्स, गॅरेज, पंक्चरची दुकाने आदींमधून पेट्रोलची अवैधरित्या विक्री सुरु असतांना कोणाचेही लक्ष दिसून येत नव्हते. अतिशय ज्वलनशिल द्रव्य विक्रीमुळे मोठा अनर्थ घडण्याची शक्यता असल्याने लोकमतच्यावतिने यावर प्रकाश टाकण्यात आला असता जिल्हयातील ४२ गावांमध्ये हा प्रकार केल्या जात असल्याचे पुढे आले होते. केवळ १० ते १५ रुपये लिटर मागील नफयामुळे हा जिवघेणा प्रकार केल्या जात होता. लोकमतने या संदर्भात वृत्त प्रकाशित करताच बहुतांश ठिकाणावरील दुकानदारांनी स्वताहून पेट्रोल विक्री बंद केल्याचे १२ मे रोजी दिसून आले.पानठेले बंदग्रामीण भागात ज्याठिकाणच्या पानठेल्यांवर पेट्रोलची विक्री व्हायची ते दुकाने आज बंद आढळून आले. यासंदर्भात चौकशी केली असता पेट्रोल विक्री संदर्भात पेपरला बातमी आली म्हणून दुकाने बंद ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले. आपल्यावर कोणत्याच प्रकारची कारवाई होवू नये म्हणून दुकानदारांनी स्वताहून खबरदारी घेतली.