शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकर्‍यांच्या मागण्यांसाठी जिल्हाभरात रास्ता रोको!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2017 01:15 IST

वाशिम: सरसकट कर्जमाफीसह शेतकर्‍यांच्या प्रलंबित मागण्या तत्काळ निकाली काढा, या मुद्यावरून आक्रमक झालेल्या प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्ह्यात विविध ठिकाणी सोमवारी रास्ता रोको आंदोलन केले.

ठळक मुद्देकर्जमाफीसह शेतकर्‍यांच्या प्रलंबित मागण्या तत्काळ निकाली काढाजिल्ह्यात विविध ठिकाणी प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केले.रास्ता रोको आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: सरसकट कर्जमाफीसह शेतकर्‍यांच्या प्रलंबित मागण्या तत्काळ निकाली काढा, या मुद्यावरून आक्रमक झालेल्या प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्ह्यात विविध ठिकाणी सोमवारी रास्ता रोको आंदोलन केले.वाशिम येथील वाशिम-अकोला महामार्गावरील जिजाऊ चौकात कार्यकर्त्यांनी सोमवारी दुपारच्या सुमारास रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे या मार्गावरील वाहतूक बराच वेळ ठप्प झाली होती. यादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. मालेगाव येथील  शेलू फाट्यावर आमदार बच्चू कडू सर्मथकांनी शेतकर्‍यांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत रास्ता रोको केला. ३0 जून २0१७ पयर्ंत कर्ज थकीत असणार्‍या शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी द्या, स्वामीनाथन आयोग लागू करा, शेतमालाला योग्य हमीदर द्या आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. या आंदोलनात गजानन बोरचाटे, विजय शेंडगे, भगवान बोरकर, अजय घुगे, महादेव बोरचाटे, दत्ता बोरचाटे, गजानन शिंदे, संतोष पवार, ओम चतरकर, हरिभाऊ लहाने, किशोर देवळे, गोपाल पवार, राजू गायकवाड, विलास तांबेकर, बालाजी टाले, किशोर शिंदे, विशाल सदार, अतुल ठाकरे, नागेश गरकळ, नितीन बोरचाटे, अनिकेत अंभोरे, ओम गायकवाड, गजानन अंभोरे, पप्पू अंभोरे, विनोद गायकवाड, पवन पाटील, आकाश खवले, प्रभाकर बोरचाटेंसह शेकडो शेतकर्‍यांची उपस्थिती होती. यादरम्यान मालेगाव-वाशिम, मालेगाव-शेलूबाजार मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.कामरगाव (ता.कारंजा) येथे शेतकर्‍यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी सुकाणू समितीच्यावतीने शेतकर्‍यांनी रास्ता रोको केला. यावेळी सुमारे तासभर वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान, पोलिसांनी आंदोलकांना स्थानबद्ध करून, नंतर त्यांची सुटका केली. या आंदोलनात भारत भगत, रवींद्र दोरक, भागवत मुंदे, सचिन मुंदे, श्रीकृष्ण र्मदाने, संदेश इंगळे,  प्रकाश खेडकर, अंबादास भोने, परशूराम सुरजुसे, डिगांबर पवार, चेतन मुंदे, राधेशाम ठाकरे, जनार्दन पांडे, शाहरूख अली, अहमद शेख, व्दारकाबाई जवंजाळ यांच्यासह अनेक शेतकरी सहभागी झाले होते. वाशिम तालुक्यातील सावरगाव बर्डे येथील शेतकर्‍यांनीही आपल्या विविध मागण्यांसाठी १४ ऑगस्ट रोजी सकाळी १0 वाजता रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे शेकडो वाहनांची रांग लागली होती. आंदोलनात भगवानराव पाटील, बाळकिसन बर्डे, किशोर कड, दशरथ शेळके, विठ्ठल कड, शंकर इढोळे, माधव जाधव, रामधन कड, बळीराम गोरे, बद्रीनाथ गोटे, ज्ञानबा कड, विष्णू बर्डे, महेश कड, अरविंद कड, शंकर मुळे, नाजूक हिवाळे यांच्यासह शेकडो शेतकर्‍यांनी सहभाग नोंदविला.