मंगरुळपीर ( वाशिम) : प्रधान सचीव,ग्रामविकास विभाग तथा अध्यक्ष राज्य निकष समिती यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामविकास मंत्रालयाच्या दालनात पार पडलेल्या बैठकीत क्षेत्र चिखली येथील संत झोलेबाबा संस्थानला वर्ग ग्रामीण तिर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात आला आहे.तालुक्यातील ङ्म्रीक्षेत्र चिखली येथील महान तपस्वी ङ्म्री संत झोलेबाबा संस्थानला तिर्थक्षेत्राचा बह्णवर्गाचा दर्जा मिळावा म्हणुन मागील वर्षभरापासुन विश्वस्त व भक्त मंडळी प्रयत्न करित होते शासनाने मागीतलेल्या सर्व दस्तावेजची पुर्तता केली त्यामुळे ग्रामविकास मंत्र्याच्या दालनात ग्रामीण तिर्थक्षेत्रांना ब वर्ग दर्जा देणे व बवर्ग तिर्थक्षेत्रांना निधीची शिफारस करण्यासाठी प्रधान सचीव,ग्रामविकास विभाग तथा अध्यक्ष राज्य निकष समिती यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली होती. बवर्ग दर्जा प्राप्त झाल्या नंतर त्या ङ्म्रीक्षेत्राच्या ठिकाणी पायाभुत सुविधेसाठी मुख्य रस्त्यापासुन तिर्थक्षेत्र,यात्रा स्थळ, मुख्यस्थळ, मंदीर, समाधी इत्यादी सारख्या मुख्य स्थळापासुन मुख्य रस्त्यापर्यंत पोच रस्त्याचे कामे हाती घेता येतील व त्या अंर्तगत रस्त्याचे मजबुतीकरण,रूंदीकरण या इतर माध्यमातुन कामे करता येतील,पोच रस्त्यावर पथदिवे उभारणे,मंदीर परिसरात संरक्षण भिंत,पिण्याच्या पाण्यासाठी टाकी बांधणे त्या अनुषंगाने परिसरात नळाव्दारे पाणी पुरवठा करणे,तसेच स्त्री,पुरूष शौचालय आणी स्नानगृहे,बांधण्या बाबत सुविधा उपलब्ध करता येवु शकते त्या बरोबरच स्त्री,पुरूष भावीक भक्तांसाठी वेगवेगळी निवास्थाने बांधता येतील,तिर्थक्षेत्राचा परिसर सुशोभित व स्वच्छ रहावा या दृष्टीकोणातुन उपलब्ध जागेवर झाडे लावणे भावीकांच्या वाहनासाठी सह वाहनतळाचे बांधकाम करता येतील.
झोलेबाबा संस्थानला बवर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा
By admin | Updated: November 29, 2014 23:37 IST